मनिषा वाल्मिकी सामुहिक अत्याचाराची घटना देशाला काळीमा फासणारी

24

🔹कॅन्ङल मार्च प्रसंगी शरदभाऊ केदारे यांची श्रद्धांजली

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.4ऑक्टोबर):-उतरप्रदेश मधील हाथरस येथे मनिषा वाल्मिकी या तरूणीवर चार नराधमांनी पाशवी बलात्कार केला. व तिची जिभ छाटली दि.29 सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान तिचे निधन झाले..हे अमानवी कृत्य असुन ही घटना संपुर्ण देशाला काळीमा फासणारी आहे अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय मानवाधिकार परिषद राष्ट्रीय कार्यअध्यक्ष शरदभाऊ केदारे यांनी व्यक्त केले सदर कॅन्ङल मार्च आयोजन जिल्हा अध्यक्ष हसीना शेख यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते देशात विशेषतः उत्तरप्रदेश बिहार मध्ये महिला, लहान मुली सुरक्षित नाहीत परंतु गाई सुरक्षित आहेत.

योगी सरकार दलितांवर अन्याय- अत्याचारावर चिडीचूप आहे.एक मनिषा वाल्मिकीची दिसलेली अनं उजेडात आलेली घटना दिसली व प्रक्षोभ उसळला एका रात्रीत तिची राखं केली .आजही देशात न दिसलेल्या किती मनिषा आहेत?
2019 च्या दलित अॅट्रासिटीचे प्रमाण उत्तरप्रदेश मध्ये 26% होते ,त्यात आता 7 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. देशभरात दर सहा मिनिटाला एक बलात्कार होतो हे N C R B सांगून जास्त दिवस झालेले नाहीत. हा देश बलात्का-यांचा आहे हे ही आकडेवारी सिध्द करते.

मनिषाचा मृत्यूदेह तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात न देता परस्पर अंत्यविधी करणा-या पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आली पाहिजे व आरोपींना लवकरात लवकर कङक शासन करावे असे शरदभाऊ केदारे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भारतीय मानवाधिकार परिषद यांनी व्यक्त केले यावेळी विल्सन उमप महाराष्ट्र अध्यक्ष, राजाभाऊ अभंग उपध्यक्ष उतर महाराष्ट्र, अमोल भाऊ अल्हाट मातंग समाज युवा नेते, हसीना शेख भारतीय मानव परिषद जिल्हा अध्यक्ष वार्तापञ शोधांश पञकार विश्वगामी पञकार संघ उतर महाराष्ट्र सल्लागार ङाॅ राजेश साळुंके, निभिॅङ पञकार शातांरामभाऊ दुनबळे यांनी श्रद्धांजली व आरोपींना कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली.

यावेळी पञकार भाऊसाहेब गायकवाड सह परिसरातील कैलास गायकवाड शोभाताई मुसळे,शिला क्रिस्ती तानाजी मुसळे, गणेश मुसळे, गिता धापोङकर मिलिंद गायकवाड बाळा गायकवाड सह परिसरातील असंख्य नागरिकांनी सहभागी झाले होते.