नायगांव पोलीस स्टेशनचे पो.हे. कॉ. विलास मोतीराम मुस्तापूरे यांना कोवीड-१९ योद्धा सन्मानपत्र गौरव प्रदान

88

🔹कंन्ट्रोल क्राईम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टने दिला पुरस्कार

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.4ऑक्टोबर):-कोरोना व्हायरस / कोवीड-१९ या जागतिक महामारीच्या संकट कालखंडात नायगांव पोलीस स्टेशन चे पोहेकॉ श्री विलास मोतीराम मुस्तापूरे साहेब व पोलीस अधिकार व सर्व पोलीस स्टाॅप आपल्या जिवाची पर्वा न करता अहोरात्र २४ तास अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.

त्यांच्या या उल्लेखनीय जनसेवा कार्याचा सन्मान व्हावा यासाठी कंन्ट्रोल क्राइम अन्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या वतीने कोवीड-१९ योद्धा विषेश सन्मानपत्र ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद दत्तात्रय पांचाळ यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले, यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तुकाराम कांबळे संभाजी शंकरराव पांचाळ सचिन सुरेशराव फुलारी केरूरे उपस्थित होते पोहेकॉ श्री विलास मुस्तापुरे साहेब त्यांच्या या कर्तव्य दक्ष कार्याची शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी प्रशंसा केली.

कोरोना सदृश्य या आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर नर्स पोलीस कर्मचारी रेल्वे कर्मचारी पत्रकार समाज सेवक साहित्यिक व ईतर बांधव भगिनीं यांच्या मुळेच आज आपण सर्वजण सुखरूप आहोत अशा कोरोना योद्धाचा सन्मान करणे आमचे भाग्य आहे,असे मत ट्रस्टचे नांदेड जिल्हा प्रमुख शिवानंद पांचाळ नायगांवकर यांनी आमच्या न्युजशी बोलताना व्यक्त केले,पोहेकॉ श्री विलास मोतीराम मुस्तापुरे साहेब यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.