रयत शेतकरी संघटनेचे गढी जिल्हा परिषद प्रमुख गणेश ढाकणे यांची निवड

14

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.4ऑक्टोबर):-अड रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख माजी न्यायाधीश साहेब रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा प्रमुख सुनील ठोसर यांच्या नेतृत्वाखाली बापुसाहेब देशमुख साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी गढी जिल्हा परिषद सर्कल प्रमुख गणेश भाऊ दत्तात्रय ढाकणे यांनी नियुक्ती करण्यात आली.

असून पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.शेतकरी कामगार म्हणून ओळखले जाणारे शेतकरी राजा यांच्या हितासाठी व त्यांच्या न्याय हक्कासाठी एकत्र आवाज उठवून संघर्ष करण्यात बळकट मिळावा..

तळागाळातील जनतेच्या भावना जाणवून योग्य दिशा दाखवून पाठबळ करावे..शेतकरी माय बाबांच्या अडचणी दुर करण्यासाठी जिवाचं रान करून शेवटच्या शेतकरी व सर्व सामान्य माणसापर्यंत पोहचवण्याचे काम शेवटच्या क्षणापर्यंत करिन असे ढाकणे यांनी सांगितले.. व तुमच्या कार्याला यश मिळावे हीच सदिच्छा. पुढील वाटचालीस मनःपुर्वक शुभेच्छा….