✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.४ऑक्टोबर):-शहरातील शेळ्या चोरिच्या तक्रारीनंतर पोलिसांच्या डीबी पथकातील पोलिसांनी काल नागपुर येथील टोळीतील तीन अट्टल चोरट्यांना सात शेळ्या तसेच वाहनासह ताब्यात घेतले.यात डीबी पथकाने अनेक ठिकाणी चोऱ्या करणाऱ्या टोळीला मारोतीसुझुकी कार वाहनासह आरोपींना अटक करीत ३ लाख ३३ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केला.

प्राप्त महितीनुसार फिर्यादि इमरानखान कादरखान रा.गौतम वार्ड हिंगणघाट याने त्याच्या मालकीच्या सात शेळ्या चोरी गेल्याबाबत दोन दिवसापुर्वी तक्रार नोंदविली होती.
इमरान खान याचे तक्रारीवरुन पोलिसांनी यासंबंधी पाळत ठेवून सखोल चौकशी केली,खबऱ्याने पोलिसांना वडनेर मार्गाने पांढऱ्या मारोती वैनमधे शेळ्यासह आरोपी हिंगणघाटकड़े निघाले असल्याची माहिती दिली.

माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांच्या डीबी पथकाने सापळा रचुन आरोपींना राष्ट्रीय महमार्गावरील नांदगांव चौकात ताब्यात घेतले.यात ७ शेळ्यासह टोळीतील आरोपी रणजीत घनश्यामसिंग चौहान(४९) रा.पार्वतीनगर,नागपुर,धरमवीर चौहान(३१)रा.शशिकांत सोसाइटी,गोरेवाड़ा,नागपुर तसेच मोहमंद जुबेरखान मोहमंद जब्बारखान(२६)रा.लालगंज दहिबाजार,नागपुर याना ताब्यात घेतले.

पोलिसी हिसका दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून या टोळीने यवतमाळ,वर्धा,नागपुर जिल्ह्यात असे अनेक गुन्हे केले असल्याची माहिती हिंगणघाट पोलिसांना दिली.
तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचे गोधन तसेच शेळ्यामेंढ्यां चोरीस जात असून गोपालक तक्रारसुद्धा करीत नाही.याचाच फायदा घेऊन हे चोरटे घेत असतात.

सदर घटनेतील आरोपींचा पीसीआर झाला असून सदर तपास ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांचे मार्गदर्शनाखाली पोहवा शेखर डोंगरे,गजानन काळे व चमु करीत आहे.

Breaking News, क्राईम खबर , महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED