परभणी जिल्ह्यात राज्यस्तरीय पुरस्कारासाठी ‘किल्ले धारूर’ चा डंका

7

🔹पत्रकार, जिल्हाध्यक्ष हनुमंत तोंडे यांना ‘एकता राज्यस्तरीय’ पुरस्काराने सन्मानित

✒️नवनाथ आडे(विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

धारूर(दि.4ऑक्टोबर):- एकता सेवाभावी संस्था परिषदेतर्फे पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते हनुमंत तोंडे यांना यंदाचा समता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.तोंडे हनुमंत हे रा.सोनीमोहा,ता.धारुर येथील असून त्यांनी आपल्या गावाचे, तालुक्याचे नाव पुर्ण महाराष्ट्र भर गाजवले आहे.जीवन गौरव, महाराष्ट्र गौरव, एकता गौरव, समाज रत्न,अशा पद्धतीने काही दिवसांपूर्वी या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविले होते.आज २ ऑक्टोंबर रोजी निवड हनुमंत तोंडे यांची राज्यस्तरीय एकता पुरस्कार साठी निवड करण्यात आली. खा. फौजिया खान यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र,मानचिन्ह,असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

एकता सेवाभावी संस्था महाराष्ट्र परिषदेतर्फे समता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंतीचे व एकटाच संस्थेच्या २३ व्या वर्धापन दिनानिमित्ताचे औचित्य साधून बुधवारी 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सभाग्रह, ज्ञानोपासक महाविद्यालय, जिंतूर रोड, परभणी येथे सकाळी १२.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो पुरस्कारांचे मान्यकरी फुले-शाहू- आंबेडकर-गांधी अनुयायी उपस्थित होते. तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून विविध ठिकाणांहून येणाऱ्या समता गौरव, महाराष्ट्र गौरव, जीवन गौरव, समाजरत्न या पुरस्काराचे मान्यकरी यावेळी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे पुरस्काराचे वितरण खा.फोजिया खान यांच्या हस्ते झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी खा.गणेशराव दुधगावकर तर प्रमुख अतिथी जे.एन.यु नवी दिल्ली चे प्रोफेसर तथा मानवी हक्क चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.मिलिंद आव्हाड, सिने अभिनेते अनील मोरे, महाराष्ट्र युवक कांग्रेस चे जनरल सेक्रेटरी प्रेरणाताई वरपुडकर,सेने अभिनेते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर नुसते पाटील, हे विचार मंच उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अरुण मराठे, कार्याध्यक्ष प्रा.अशोक जोंधळे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष अरुण पडघन,व कार्यक्रमाचे संयोजक, एकता संस्था संस्थापक आजमत खान , तसेच एकताचे शहराध्यक्ष सईद तसेच अपंग जनता दल सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष गाडेकर डी.एच तसेच बीड महासचीव भारत डोंगरे तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.