इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या सक्तीच्या प्रवेश शुल्कावर प्रशासनाने अंकुश लावावा

34

🔹प्रवीण चन्नावार यांची मागणी

✒️संतोष संगीडवार(आल्लापल्ली प्रतिनिधी)

मो:-7972265275

आल्लापल्ली(दि.4ऑक्टोबर):-कोरोनाचे पार्श्वभूमीवर सरकारने लाकडाऊन घोषित केल्यावर उद्योग व्यवसाय ठप्प पडलेले आहे.मार्च महिन्यापासून शाळा बंद आहेत तरीही मागील वर्षीची पूर्ण शाळेची फी पालकांनी भरलेली आहे.मागील महिन्यापासून ऑनलाईन क्लास सुरू आहेत. परंतु खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी पूर्ण वर्षांची फी वसूल करण्याचा तगादा काही शाळांनी लावला आहे.यावर प्रशासनाने आवर घालावा अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केलेली आहे.

कोरोनाचे पार्श्वभूमीवर सर्वजण आर्थिक अडचणीत आहेत. शाळा अजूनपर्यंत बंद आहेत.कधी सुरू होतील याची शास्वती नाही. मागील सत्रातील संपूर्ण फी पालकांनी भरलेली आहे. तरीही यावर्षीची फी काही इंग्रजी माध्यमाच्या शाळा पालकांना फोन करून फी भरण्यासाठी तगादा लावल्या जात आहे.फी न भरल्यास रिमोव्ह करण्याच्या धमक्या देत आहेत.ऑनलाईन क्लास सुरू आहेत ती फी घ्यायला पाहिजेत त्याची पालकांना काहीच हरकत नाही.परंतु पूर्ण फी वसूल करण्याचा गोरखधंदा काही शाळांनी सुरु केलेला आहे.

याला पालकांचा विरोध आहे.ऑनलाईनक्लासेसची फी घ्यावी अशी त्यांची मागणी आहे.शाळा बंद असल्याने फक्त ऑनलाईन फी घेऊन पालकांना वेळोवेळी पूर्ण फी भरण्यासाठी तगादा लावू नये.प्रशासनाने या बाबीचा विचार करून इंग्रजी माध्यमाच्या शाळांना तसे आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चन्नावार यांनी केलेली आहे.