धाराशिव साखर कारखाना युनिट१ चोराखळी जि.उस्मानाबादचा ८व्या गळीत हंगामाचा मोळी पुजन शुभारंभ

  43

  ?प्रगतशील आकरा शेतकऱ्यांच्या हस्ते प्रारंभ

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.4ऑक्टोबर):-प्रगतशील आकरा शेतकरी बाळासाहेब पाटील,धनंजय गायकवाड, अमोल जोगदंड, सुनील पाटील, प्रदीपनाना सस्ते, रविराजे देशमुख, रणजित कवडे, भास्कर पुरेकर, तात्यासाहेब भिंगडे, महादेव कवडे, अनिल पाटील यांच्यासह समीर दुधगावकर, मनसेचे नेते दिलीपबापू धोत्रे, ॲड.विजय निरस, ॲड. विठ्ठल भिसे, पंढरपूरचे बाबुराव जाधव, आदीनाथ मुलाणी, कदम चोराखळीचे मा. खंडेराव मैदांड, उपसरपंच पांडुरंग मैदांड, मनसेचे शशिकांत पाटील, सागर बारकुल, औदुंबर वाघ, ज्ञानेश्वर कांबळे, कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष काबंळे, दिपक आदमिले, विकास काळे, याशुभप्रसंगी काटा पुजन करून ऊस भरून आलेल्या वाहनांचे पुजन केले व गव्हाणीत मान्यवरांच्या हस्ते मोळी टाकण्यात आली.

  गेल्यावर्षी दुष्काळग्रस्त परिस्थिती असताना देखील कारखाना चालवून येथील शेतकऱ्यांना, कामगारांना कारखान्याने न्याय दिला. गेल्यावर्षी सन २०१९-२०च्या हंगामात एफआरपी पेक्षा जास्त दर आपण २५००रू. जाहिर केल्याप्रमाणे पहिला हाफ्ता २१०० रू. तर पोळासणासाठी २००रू. जमा करण्यात आला. असे एकूण २३०० रू. शेतकऱ्यांना अदा करण्यात आले. उर्वरित रक्कम दिवाळीत देऊ.

  यंदा निसर्गाने चांगली साथ दिल्याने शेतकऱ्यांत आनंदाचं वातावरण असून ऊसामध्ये टनेजचे चांगली वाढ आहे. शेतकऱ्यांनी जपलेल्या ऊसाला चांगला भाव देण्याचे घोषित केले.

  कोरोनाच्या पार्श्वभूमी असताना देखील कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुर्ण केली. कर्मचाऱ्यांना दहा टक्के पगार वाढ करून त्यांना गाळप हंगामासाठी शुभेच्छा दिल्या. #चार_लाख उच्चांक गाळप करण्याचा मानस आहे. कारखानावर कोवीड सेंटरची सोय केली आहे जेणेकरून कर्मचारी, किंवा तोडणीतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास तत्काळ त्यांना कारखानावरच कोवीड सेंटर मध्ये ठेवण्यात येईल.

  यावेळी कारखान्यातील सर्व अधिकारी,कर्मचारी, ऊस उत्पादक शेतकरी, वाहन ठेकेदार, तोडणीदार उपस्थित होते.