
🔸सर फौंडेशन आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये दैदीप्यमान यश
✒️गोंदिया (पुरोगामी संदेश नेटवर्क)
गोंदिया(दि.4ऑक्टोबर):-जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा निंबा ,पंचायत समिती गोरेगाव ,जिल्हा परिषद गोंदिया येथे कार्यरत असणारे उपक्रमशील शिक्षक राजेन्द्र धर्मदास बन्सोड यांची सर फौंडेशन टिचर अवॉर्डसाठी निवड झालेली आहे.
स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फौंडेशन महाराष्ट्र (सर फौंडेशन) आयोजित राष्ट्रीय स्तर शैक्षणिक नवोपक्रम स्पर्धा 2020 मध्ये शालेय स्तरावर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास विविध नवोपक्रमाद्वारे साधण्यात येतो.यासाठी नवोपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर एक मोठे व्यासपीठ सर फौंडेशन उपलब्ध करून देते. यात देशपातळीवर क्षेत्रीय अधिकारी व प्रयोगशील शिक्षकांचे नवोपक्रम राष्ट्रीय स्तरावर सादर केले जाते.
श्री राजेन्द्र बन्सोड यांनी प्राथमिक विभागातून “माझा कविता संग्रह” हा मुलांसाठी चालवीत आलेला कविता लेखन आणि सादरीकरण या नवोपक्रमाची निवड करण्यात आली. या उपक्रमात मुलांना कविता लेखन आणि सादरीकरण करण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. लाकडाऊन काळात ऑनलाईन तसेच ऑफलाईन सादरीकरण घेण्यात आले. साहित्य वाचन आणि लेखनाची आवड यातून मुलांमध्ये निर्माण करण्याचा निश्चितच फायदा मिळाला.विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या कवितांचा संग्रह करण्यात आला.मुलांना या काळात त्यांच्या सृजनशीलतेस एक व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य यातून घडले.
या पुरस्काराबद्दल जिल्हा परिषद व.प्रा.शाळेचे मुख्याध्यापक आर.एच.नंदेश्वर सर,व शिक्षक वृन्द,केंद्रप्रमुख आर.आर.अगडे सर,शालेय व्य.समितीचे अध्यक्ष माधवभाऊ शिवणकर तसेच सदस्य, मतापालक संघाच्या अध्यक्ष सौ. तेजेश्वरी ठाकरे व सदस्य,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष संजय शहारे आणि सदस्य,प्रेरक विजय कोचे यांनी राजेंद्र बन्सोड सरांचे अभिनंदन केले.त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.