ज्याच्या हाती रोजगाराची दोरी, त्यालाच बसविले आपल्या घरी – उमेद कर्मचारी ब्रम्हपुरी

38

🔹उमेद कर्मचाऱ्यांचे मुंडन करून, खाजगी करण्याचा जाहीर निषेध

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.5ऑक्टोबर):- केंद्र व राज्य शासनाने ग्रामीण कुटुंबास दारिद्र्य निर्मूलन करून त्यांचे जीवनमान उंचविण्यासाठी २०११ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान (NRLM) सुरु केले. त्याच धर्तीवर राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) अर्थात उमेद राबविले जात आहे. या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात ग्रामीण भागातील गरिबातील गरीब कुटुंबातील महिलाचे एकूण ४,७९,११८ बचत गट व त्यामध्ये ४९,३६,३५५ महिला सहभागी असून त्याचे २०३८४ ग्राम संघ आणि ७९९ प्रभाग संघ कार्यरत आहेत.

त्याचप्रमाणे चंद्रपुर जिल्ह्यात एकूण १७,३१५ बचत गट व त्यामध्ये १,८३,२६३ महिला सहभागी असून त्याचे ८९८ ग्राम संघ आणि ३४ प्रभाग संघ कार्यरत अमून टप्या टप्पाने काम प्रगतिपथावर आहे. सहभागी गरीब कुटुंबांना सामाजिक व आर्थिक विकास व्हावा यासाठी समर्पित व संवेदनशील सहाय्य यंत्रणेच्या माध्यमातून प्रशिक्षण व क्षमता बळटीकरण, फिरता निधी व भांडवली अनुदान, बैंक कर्ज इ.चे उदिष्ट साध्य केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात अनेक महिला व्यवसाय करून आपली उपजीविका शाश्वत असून ग्राम विकासात सुद्धा अग्रेसर आहेत.

मात्र कोविद -१९ चे पार्श्वभुमीवर वित्तीय उपाययोजना करण्याचे नावाखाली ग्राम विकास विभागाकडून अभियान अंमलबजावणीमध्ये बदल करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहे. नुकतेच दिनांक १० सप्टेंबर २०२० रोजीचे पत्रान्वये कार्यरत कर्मचारी यांचे करार नूतनीकरण करण्यात येऊ नये. अशा सुचना निर्गमित केल्याने राज्यातील ४५० कर्मचारी बेरोजगार झाले ज्यांचे भविष्यात करार समाप्त होईल त्यांना सुद्धा कामावरून टप्याटप्याने कमी करण्याचे धोरण आहे. परिणामी अभियानाचे माध्यमातून तयार झालेल्या महिलांचे गट, ग्राम संघ आणि प्रभाग संघ विस्कळीत होणार आहे.

सक्षम महिला म्हणून समोर आलेल्या संपूर्ण राज्यातील जवळजवळ १ लाख महिला कार्यकर्त्या समूह संसाधन व्यक्ती (CRP) ज्यांना दरमहा ३ हजार रुपयापर्यंत मानधन दिले जाते. त्यांना सुद्धा मुदतपूर्व कमी केले जाऊ शकते. ग्रामीण महिलाचे संस्थाना शासनाने व बँकेने दिलेल्या करोडो निधीने व्यवस्थापन आणि परतफेड योग्य प्रकारे होणार नमून अभियान विस्कळीत होण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही.

त्यामुळे अभियानातील कर्मचाऱ्यांनी खाजगिकरणाच्या व 10सप्टेंबर च्या परिपत्रकाचा निषेध म्हणून जिल्ह्यातील ब्रम्हपुरी इथे गोळा होऊन संयुक्तिकरित्या मुंडन आंदोलन केले.