हातरस सामुहिक अत्याचाराची घटना ही देशाला काळीमा फासणारी घटना – अॅड सतीश काळम पाटील

  67

  ?वंचित बहुजन आघाडी ने उत्तरप्रदेश योगी सरकारचा केला जाहिर निषेध

  ?मनिषा वाल्मिकी अत्याचार प्रकरणी आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्या अशी वंचित बहुजन आघाडी ने केली मागणी

  ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)
  मो:-८८०९४२१८५

  केज(दि.5ऑक्टोबर):-उत्तर प्रदेश येथील हातरस मधील दलित तरुणी मनीषा वाल्मिकी या तरुणीच्या बलात्कार करून , जीभ कापून, तिचा पाठीचा कणा तुटे पर्यंत मारहाण करून ,उत्तर प्रदेश येथील जातीवादी मानिसकतेच्या ठाकूर समाजातील आरोपीना उत्तर प्रदेश येथील जातीवादी भाजपा चे योगी सरकार व तेथील पोलीस व महसूल प्रशासण आरोपींना पाठीशी घालत आहे.

  त्या निमित्त आरोपीना फाशी मिळावी, आरोपीना सहकार्य करणाऱ्या पोलीस प्रशासना तील कर्मचारी याना सह आरोपी करून पीडित तरूणी ला न्याय मिळावा या करिता आज अंबाजोगाई उपजिल्हा कार्यलया समोर बीड जिल्हाध्यक्ष अनिल भाऊ डोंगरे यांच्या आदेशानुसार अंबाजोगाई तालुका कार्यकारणी तर्फे निदर्शने करण्यात आली.

  यात, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष जांबुवंत उर्फ संजय भाऊ तेलंग, जेष्ठ कार्यकर्ते ऍड काळम पाटील साहेब, ,तालुका उपाध्यक्ष ऍड सुभाष जाधव, शहराध्यक्ष अमोल दादा हातागले, तालुका संघटक सुशील धिमधिमे, खाॅजाभाई पठाण,तालुका सचिव अजय वाघमारे, केज तालुका सचिव नवनाथ पौळ, रिपब्लिकन सेना जिल्हाउपाध्यक्ष अजयजी गोरे, वंचित बहुजन आघाडीचे अभिजित डोंगरे, विजय जगताप, धनराज सोनवणे आदी ने सहभाग नोंदवून अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.