धनगर समाजाला जलगतीने आरक्षण देऊन मेंढपाळांना चारा उपलब्घ करुन द्या – मा योगेश दादा खरात

29

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.5ऑक्टोबर):-राज्यात मराठा आरक्षणाच्या पाठोपाठ धनगर आरक्षणाचा मुद्दा ही पेटू लागला आहे. धनगर समाजाचा एसटीमध्ये समावेश करावा, या प्रमुख मागणीसह इतर मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी धनगर समाज रस्त्यावर उतरताना दिसू लागला आहे. पुणेमध्येही आज राष्ट्रीय जनहित पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच पंधरा दिवसात विशेष अधिवेशन बोलवुन धनगर समाजाला जलगतीने आरक्षण न दिल्यास मंत्र्यांच्या घरात मेंढरे सोडु असा इशारा सरचिटणीस मा योगेश दादा खरात यांनी दिला आहे.

यावेळी सकल धनगर समाजाच्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.
राज्य सरकारने विधानसभा व विधानपरिषद दोन्ही सभागृहांमध्ये ठराव करून धनगर व धनगड हे एकच आहेत, अशी केंद्र सरकारला शिफारस करावी. केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावून आदेश काढून आरक्षण द्यावे किंवा राष्ट्रपती महोदयांनी वटहुकूम काढून धनगर समाजाला आरक्षण द्यावे. महाराष्ट्रातील धनगर समाज गेल्या ६५ वर्षापासून एसटी आरक्षणाची मागणी करत आहे.

तरी त्याची रिट पिटीशन उच्च न्यायालयात चालू असून राज्य सरकारच्या वतीने फास्ट ट्रॅक कोर्टात ही रिट पिटीशन चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा. पदोन्नतीसाठी पात्र कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात यावी, पोलीस मेगा भरती तत्काळ सुरू करण्यात यावी, धनगर समाजाच्या उन्नतीसाठी मागील सरकारने मंजूर केलेला एक हजार कोटी रुपयांचा निधी तात्काळ देण्यात यावा,चारा नाही मेंढपाळांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी सरकारने मेंढपाळांना वेगळा कायदा करुन शस्त्र बाळगण्यास परवाना देण्यात यावा.

अशी मागणीही यावेळी राष्ट्रीय जनहित पार्टीचे सरचिटणीस मा योगेश दादा खरात यांनी केली आहे.यावेळी त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष बाबाराजे कोळेकर, युवती प्रदेशाध्यक्ष नेहा प्रिन्सेस,पुणे महिला जिल्हाध्यक्षा संगिताताई मांजरेकरसह अनेकांची उपस्थिती होती.