नवरात्रोत्सवापासून मंडप वापरासाठी परवानगी देण्यात यावी – माजी आमदार विलासराव बापु खरात

26

🔹मंडप व्यवसाय किती दिवस बंद ठेवणार ?

🔸अंबड व घनसावंगी तालुका मंडप मालक संघटनेने भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार विलासबापू खरात यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले

✒️अतुल उनवणे(जालना,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9881292081

जालना(दि.5ऑक्टोबर):-नागरिकांची जनजनजीवन बाजारपेठा सध्या पूर्ववतपणे सुरु झालेल्या आहेत.सध्या शासनानेही बहुतेक सर्व व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी दिलेली आहे. सर्व व्यवहार सुरळीतपणे चालू असताना गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवरच बंदी का ? आणखी किती दिवस मंडप व्यवसाय बंद ठेवणार ? असा परखड सवाल भाजपचे जेष्ठ नेते माजी आमदार विलाराव बापू खरात यांनी उपस्थित केला.

शासनाने नवरात्रोत्सवापासून मंडप व्यवसायिकांना आपला व्यवसाय सुरू करण्यास नियम व अटी घालून परवानगी द्यावी,अशी मागणी यावेळी विलास बापू खरात यांनी केली. मंडप व्यवसायिकांना तातडीने मंडप व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी व इतर संबंधित अधिकाऱ्यांना आजच पाठविण्यात येईल,असे विलासराव बापु खरात यांनी सांगितले. विलासबापु यांची अंबड व घनसावंगी तालुका मंडप व्यावसायिक संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक जगताप, उपाध्यक्ष व इतर मान्यवर आदी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली.यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन विलासराव बापु यांना सादर केले.

त्यानंतर विलास बापू खरात यांनी संघटनेच्या शिष्टमंडळाबरोबर चर्चा केली गेल्या आठ महिन्यांपासून मंडप व्यवसायिक हे कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी नसल्याने आर्थिक अडचणीत सापडले आहेत, सध्या त्यांच्यापुढे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. गावोगावच्या मंडप व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आल्याचे या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.