आष्टी येथील विश्राम गृहाची दुरवस्था-प्रशासनाचे दुर्लक्ष

9

🔸आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन सादर

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.6ऑक्टोबर):- येथे १९२७ मध्ये ब्रिटिशांनी विश्रामगृहाची निर्मिती केली. मागील ९०व वर्षांपासून विश्रामगृह स्थित आहे.

स्वातंत्र्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे विश्रामगृहाच्या देखभालीची जबाबदारी आली. काही वर्षा पूर्वी येथे मुलांना खेळायला पाळणे, बसायला गवताची सोय, रंगी बेरंगी फुलांचा बगीचा, झाडांची सावली आणि असंख्य पक्षांचा वावर नैसर्गिक अस वातावरण. परंतु आता या भागात विशेष लक्ष न दिल्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांसाठी हे विश्रामगृह आधी सारखे आकर्षक राहिलेले नाही.

काही वर्षांपूर्वी येथील कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानाची व्यवस्था सुद्धा शासणा कडून होती परंतु दुर्लक्ष करताच त्याचे कवेलू, दारे, खिडक्या चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. विश्रामगृहासभोवताल वृक्ष-वेली वाढल्या आहेत. परिसरात कचरा उगवला आहे, विश्रामगृहातील मागील एका खोलीत पाणी सुध्दा गळत आहे, आता पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही.

त्यामुळे ब्रिटिश काळापासून जपलेला वारसा नष्ट होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या विश्रामगृहाची दुरूस्ती व रंगरंगोटी करावी, अशी मागणी परिसरातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यानी आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देन्यात आले.

निवेदन सादर करताना श्री राहुल डांगे (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी युवा), श्री संतोष डाहाळे ( शहर अध्यक्ष राष्ट्रवादी) , विवेक खोब्रारागडे (जि.सचिव राष्ट्रवादी) शहबाज शेख (शहर उपा.राष्ट्रवादी) हंसराज दुर्गे (शहर कोषाअध्यक्ष राष्ट्रवादी) विंदेश कानेकार ( शहर सचिव राष्ट्रवादी) उपस्थित होते.