✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8698648634

गोंडपिपरी(दि.6ऑक्टोबर):- तालुका हा ग्रामीण भागाने व्यासला आहे. याचा फायदा घेत इथे कार्यरत असलेली प्राची गॅस एजेन्सी गोंडपिपरी, यांच्या मार्फत दिले जात असलेले गॅस सिलिंडर आपल्या गाडीने गावात नेऊन देतात. एजेन्सीला कंपनी कडून गॅस सिलिंडर भरून घेताना एजेन्सी मालकाला ग्राहकाकडून कोणतेही अतिरिक्त भाडे आकारण्याचा अधिकार नसतो. कारण घरपोच डिलिव्हरी चार्जेस(घरपोच भाडे) हे आधीच गॅस च्या किमतीमध्ये मिळवलेले असते.

लक्षात असू द्या की 10 – 20 रुपयांसाठी तुम्हाला स्वतःला, तुमच्या आईला, तुमच्या पत्नीला, तुमच्या बहिणीला, तुमच्या मुली – मुलाला, तुमच्या भावाला भर उन्हात एक तास भर घाम गाळावा लागतो. म्हणून आपले पैसे व आपली फसवणूक टाळा.18002333555 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत सरकार च्या या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून आपण सुद्धा ही माहिती मिवळू शकता.

एखाद्या ग्राहकाने जर स्वतः गॅस सिलिंडर एजेंसी च्या गोडाऊन वर जाऊन गॅस सिलिंडर भरून घेतला तर त्या ग्राहकाला एजेंसी कडून 19.50/- रूपये. (एकोनविस रुपये पन्नास पैसे) परत घेण्याचा अधिकार आहे. कोणताही एजेंसी मालक हे पैसे परत देण्यास नकार देऊ शकत नाही.

सध्या सप्टेंबर 2020 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात HP गॅस च्या घरगुती वापराच्या 14 किलो च्या सिलिंडर ची किंमत 650/- रूपये आहे. जर एजेंसी कडून तुम्हाला तुमच्या गावात घरपोच सिलिंडर मिळत असेल तर तुम्ही फक्त 650/- रूपये देऊन ते सिलिंडर कायदेशीर रित्या विकत घेऊ शकता. 650/- रूपये च्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क / भाडे देण्याची गरज नाही.

एजेंसी मालकाचा गॅस गोडाऊन हा आपल्या गावापासून कितीही किलोमीटर अंतरावर असला तरीही तो एजेंसी मालक ग्राहकाकडून कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त भाडे आकारू शकत नाही. बरेच एजेंसी मालक किंवा त्यांचे कर्मचारी गोडाऊन व आपल्या गावचे अंतर जास्त आहे असे सांगून खेडे भागातील ग्राहकांची लूट करतात.

सर्व ग्राहकांनी कृपया हे लक्षात घ्यावे की HP ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. व कोणताही एजेंसी मालक किंवा त्याचा कर्मचारी स्वतःचे नियम लावून ग्राहकांना चुकीची माहिती देऊन ग्राहकांची लूट करू शकत नाही. कोणताही एजेंसी मालक किंवा त्याचा कर्मचारी असे करत असल्यास तो कायदेशीर गुन्हा आहे.

*गॅस सिलिंडर भरून घेताना ग्राहकांनी खालील मुद्दे न विसरता लक्षात ठेवावे.*

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ग्राहकांनी गॅस सिलिंडर भरून घेतल्यावर एजेंसी मालकाकडून किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून बिलाची पावती न विसरता घ्यावी.
(कोणतीही वस्तू विकत घेतल्यानंतर त्या वस्तू चे बिल घेणे हा ग्राहकाचा अधिकार आहे.) कोणत्याही गॅस एजेंसी कडून गॅस सिलिंडर विकत घेतल्यानंतर प्रत्येक ग्राहकाने त्याचे वजन करून घ्यावे. कोणताही एजेंसी मालक गॅस सिलिंडर चे वजन करून देण्यास नकार देऊ शकत नाही. तसेच गॅस सिलिंडर चे वजन करून घेणे हा ग्राहकांचा अधिकार आहे.
गॅस सिलिंडर मधला गॅस काढून घेण्याचे प्रकार अनेकदा घडलेले आहेत. त्यामुळे आपल्याला कमी गॅस मिळतो. म्हणून आपले नुकसान व आपली फसवणूक टाळण्यासाठी गॅस सिलिंडर चे वजन करून घ्यायला विसरू नका.

inden gas price in Maharashtra

Bharat gas price in Maharashtra
गुगल वर असे टाइप केल्यास तुम्हाला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील गॅस सिलिंडर चे सध्या चालु असलेल्या व मागील महिन्याचे घरपोच डिलिव्हरी चे रेट कळतील. त्यापेक्षा जास्त पैसे कोणीही देऊ नये.

कोणताही एजेंसी मालक किंवा त्यांच्या कर्मचारी ग्राहकांकडे भाड्या चे किंवा इतर कोणतेही कारण सांगून अतिरिक्त पैश्यांची मागणी करत असल्यास ग्राहकांनी 18002333555 एचपी च्या या हेल्पलाईन नंबर वर संपर्क करून एजेंसी मालकाची तक्रार करावी.

सर्वांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करा. गॅस एजेंसी वाले आपल्या अज्ञानाचा फायदा घेऊन आपली लूट व फसवणूक करत आहेत.

या विरोधात सर्व गावातील प्रत्येक व्यक्तीने आवाज उठवा, एजेंसी वाल्यांना प्रश्न विचारा, गॅस सिलिंडर चे बिल मागा व सिलिंडर चे वजन करून घ्या.गावातील प्रत्येकाने एकत्र येऊन या अन्यायाचा व या फसवणुकीचा विरोध करा.
आपली घामाची व कष्टाची कमाई फुकट कुणाला वाटू नका.

18002333555 इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत सरकार च्या या ग्राहक सेवा क्रमांकावर फोन करून आपण सुद्धा ही माहिती मिवळू शकता.मात्र गोंडपिपरी तालुक्यातील काही गाडीवाले जास्तीचे पैसे घेत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED