शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांच्या नोंदणीचे शिबिर

6

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपुर(दि.6ऑक्टोंबर):-उपप्रादेशिक परिवहन कार्यालय चंद्रपूर कार्यालयाच्या वतीने चिमूर, वरोरा, मुल, ब्रह्मपुरी व गडचांदूर येथे शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्क्या अनुज्ञप्तीचे, खाजगी संवर्गातील वाहनांची नोंदणी इत्यादी कामांविषयी शिबिर घेण्यात येणार आहे.

इच्छुक अर्जदारांनी www.parivahan.gov.in या संकेत स्थळावर सारथी या सॉफ्टवेअरमध्ये अपॉइंटमेंट घेण्यात यावी. अपॉइंटमेंट नसल्यास ऑनलाइन चाचणी देता येणार नाही याची नोंद घ्यावी. या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दिपक जाधव यांनी केले आहे.

या ठिकाणी असणार शिबिर:-

दिनांक 8 ऑक्टोंबर रोजी आनंद निकेतन महाविद्यालय आनंदवन वरोरा, 9 ऑक्टोंबर रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 15 ऑक्टोंबर रोजी कर्मवीर महाविद्यालय मुल, 22 ऑक्टोंबर रोजी एन.एच महाविद्यालय ब्रह्मपुरी तर 29 ऑक्टोंबर रोजी शरद पवार महाविद्यालय गडचांदूर येथे शिबिर होणार आहे.