स्मृतीशेष परमानंद नंदेश्वर यांच्या जन्मदिनानिमित्त रुग्णांना फळेवाटप

41

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.6ऑक्टोबर):- आंबेडकरी सामाजिक चळवळीतील ब्रह्मपुरीतील एक अग्रगण्य कार्यकर्ता, नेता आयु. परमानंद नंदेश्वर यांनी 27 सप्टेंबर 2020 ला चळवळ सोडून कायमस्वरूपी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांच्या प्रेरणेने, त्यांनी उभ्या केलेल्या सामाजिक चळवळीला त्यांच्याच नावाने जिवंत ठेवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते अजूनही जिवंत आहेत असे कार्यकर्ते सांगतात. परमानंद नंदेश्वर सर दरवर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त सरकारी रुग्णालयात ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करायचे, त्याच्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते सुद्धा असायचे.

आज ते या जगात नाहीत. मात्र त्यांच्या पत्नी भूमिका नंदेश्वर व बेनेसा कार्यकर्ते यांनी पुढाकार घेऊन 6 ऑक्टोबरला त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालय ब्रह्मपुरी व कोविड सेंटर ब्रम्हपुरी याठिकाणी दाखल असलेल्या सर्व रुग्णांना फळे वाटप केले. ही फळे वाटप करण्यासाठी प्रेरणा होती ती आयुष्यमान परमानंद नंदेश्वर सर यांची. दी बुद्धिस्ट असोसिएशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी माणसं जोडली.

अगदी जीवाला जीव देणारी माणसं. ज्या काळात लोक घराच्या बाहेर निघत नाहीत त्या कोरोना काळात सामाजिक बांधिलकी म्हणून परमानंद नंदेश्वर यांच्या 6 ऑक्टोंबरच्या जन्मदिवसाच्या औचित्याने संघटनेचे कोषाध्यक्ष वैकुंठ टेंभुर्णे सर, संघटना सल्लागार डॉ. रवींद्र मेश्राम, संघटनेचे सचिव भीमराव ठवरे सर, संघटनेचे सल्लागार सतीश डांगे सर, प्रफुल ढोक, प्रधान सर एकारा यांच्या सहयोगाने परमानंद नंदेश्वर यांच्या जन्मदिवसानिमित्त फळे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी परमानंद नंदेश्वर यांच्या स्मृतीना उजाळा दिला व त्यांच्या जन्मदिवसा निमित्ताने त्यांचे गहिवरल्या मनाने आठवण केली.