🔹सहभागी विध्यार्थ्यांना मिळणार प्रमाणपत्र

✒️गोंदिया(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गोंदिया(दि.6ऑक्टोबर):-अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्रच्या वतीने भारतरत्न डॉ ए. पी .जे.अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्ताने संपुर्ण भारतात वाचनप्रेरणा दिवस साजरा केला जातो.या प्रसंगाचे औचित्य साधून विध्यार्थीसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण विद्यार्थीना सहभागी होण्यासाठी आव्हाहन केले आहे.सहभागी विद्यार्थीना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.शाळा जरी बंद असली तरी डॉ कलाम यांच्या स्वप्नपूर्तीसाठी व सुजाण ,सक्षम नागरिक तयार होण्यासाठी वाचन आवश्यक आहे.ही बाब लक्षात घेता संस्थेने प्रश्र्नमंजुषा कार्यक्रम आयोजित केले आहे.

तेव्हा सर्वांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावे.
परीक्षेची लिंक आपल्याला अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या सर्व ग्रुपवर दि.10/10/2020 ला पाठविण्यात येईल.सर्व शिक्षकवृंद,विद्यार्थी व पालक यांनी याची नोंद घ्यावी व मोठया संख्येने सहभागी व्हावे. यात शासकीय,अनुदानित व विनाअनुदाणीत सर्व शाळेतील विद्यार्थीना सहभागी होता येईल.
यात गट तयार करण्यात आले असून ते खालील प्रमाणे आहेत.

गट क्रमांक 1-इयत्ता 1 ते 5 वि
गट क्रमांक 2-इयत्ता6 ते 8 वि
गट क्रमांक 3-इयत्ता 9 ते10 वि

असे गट तयार केले असून यात मोठयात मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे या कार्यक्रमाचे आयोजक,श्री गजानन गोपेवाड सर राज्य समनव्यक , सौ सिंधु मोटघरे जिल्हा समन्वयक गोंदिया ,यांनी सांगितले आहे.

आँनलाईन पध्दतीने प्रश्न मंजुषा सोडवण्यासाठी ईमेल आवश्यक आहे, सहभागी डिजिटल प्रमाणपत्र ईमेल देण्यात येणार आहे, विद्यार्थी नाव टाकणे बंधनकारक आहे, या उपक्रमातबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी मोबाईल क्रमांक7378670283 वर संपर्क साधावा असे आव्हान अग्निपंख फाउंडेशन महाराष्ट्र राज्य परिवार यांनी केला .

गोंदिया, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, शैक्षणिक, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED