प्रहारच्या वतीने तहसीलदार धारुर यांना निवेदन जिल्हा अध्यक्ष – अध्यक्ष रघुनाथ तोंडे

8

🔸विविध मागण्यांसाठी निवेदन

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

गेवराई(दि.7ऑक्टोबर):-प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदार मॅडम धारुर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले पुढील मागण्या विषयी तहसील प्रशासनाचे वारंवार दुर्लक्ष होत आहे आसलेल्या मागण्या संजय गांधी श्रावण बाळ योजनेचे अर्ज मंजुरीसाठीची बैठक प्रत्येक महीन्याला घेण्यात यावी असा शासन निर्णय असतांना तिन तीन महिने होऊन सुदधा बैठक घेतली जात नाही.

त्यामुळे सदर लाभार्थी वंचित राहुन तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत सबंधित कर्मचारी चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे देतात चालू असलेले संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेचे मानधन जुन नंतर अद्याप मिळालेले नाही ते तात्काळ देण्यात यावे तसेच केंद्र शासनाच्या निर्णया प्रमाने सर्व आपंगाणा अंतोदय योजनेत समाविष्ट करून घ्यावे याहस विविध मागण्यांचे निवेदन आज प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले.

आठ दिवसात मागण्या मंजूर न केल्यास संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ यांनी निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी राहुल नायकवडे उद्धव गिते विठ्ठल मुंडे विष्णु मुंडे महादेव कागणे बालाजी घोळवे यांच्यासह प्रहारचे कार्यकर्ते उपस्थित होते.