नारायणगाव खेरवाडी येथे इच्छापूर्ती सोहळा संपन्न

10

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.7ऑक्टोबर):-जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील नारायणगाव खेरवाडी येथे इच्छापूर्ती नागरी सत्कार सोहळा संपन्न झाला या खेरवाडी नारायणगाव येथील रहिवाशी असलेल्या सौ रत्ना ताई संगमनेरे यांना पंचायत समिती सभापती पदी विराजमान झाल्याबद्दल व सभापती पदाची सूत्रे हाती घेतल्याबद्दल गावच्या इतिहासामध्ये प्रथमच सदस्य व सभापती पद मिळाल्याने शाबासकीची थाप म्हणून गावाच्या वतीने इच्छापूर्ती नागरी सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मराठा विद्या प्रसरक समाजाचे सभापती माणिक तात्या बोरस्ते हे होते यावेळी एडवोकेट लक्ष्मण लांडगे सोपान संगमनेरे नायब तहसीलदार बबन तात्या लांडगे सुभाष आवारे सोमा संगमनेरे व पिके पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करून सत्कार मूर्ती शिवकन्या संबोधून सौ रत्ना ताईंचा त्यांचा सत्कार करण्यात आला, व राष्ट्रीय विश्व गामी पत्रकार संघाचे नासिक जिल्हा प्रवक्ते यांची नियुक्ती झाल्याबद्दल पत्रकार राजेंद्र अहिरे यांचा माणिक तात्या बोरस्ते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व तसेच पत्रकार संघाचे नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून निवड झालेले विजय केदारे यांचा सत्कार पंचायत समिती सभापती रत्नाताई संगमनेरे यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी पिके पाटील यांनी वक्तव्यात म्हटले की गावच्या विकासासाठी सर्वपक्षीय गट-तट संघटन बाजूला ठेवून विकासाचे राजकारण करण्याचे आव्हान गेले गावचे ज्येष्ठ नेते तथा माजी सरपंच सोपान संगमनेरे यांनी गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावचा विकास कसा करता येईल यावर विचार मांडले व माजी आमदार अनिल कदम जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाट जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब शिरसागर तालुका अध्यक्ष सुधीर भाऊ कराड यांचे आभार मानले व शेवटी माणिक तात्या बोरस्ते यांचे अध्यक्षीय भाषण झाले.

व त्यांनी खेरवाडी नारायणगाव बद्दलचा जिव्हाळा व हे गाव जागतिक लेव्हल चे कशी आहे याची संकल्पना मांडली व या कार्यक्रमास उपस्थिती एडवोकेट बबलू पवार प्रदीप शेठ मणियार नंदकुमार ऋषिकेश महाराज शंकराव संगमनेरे गोविंद संगमनेरे गणेश आवारे उमेश पगारे सतिष संगमनेरे हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार राजेंद्र अहिरे यांनी केले व ग्रामस्थांनी फटाके फोडून गुलाल उधळून आपला आनंद व्यक्त केला आहे.