मनमाड येथे महाराष्ट्र नगरपालिका कामगार कर्मचारी संघटना तर्फे अमरण उपोषण

10

✒️ शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)मो:-9960227439

नाशिक(दि.7ऑक्टोबर):- जिल्ह्यातील मनमाड येथे नगरपरिषदेत गेल्या ७ ते ८वर्षापासून ते आज पावेतो सेवेत असतांना मयत झालेल्या 8 स्थायी कामगार व शासन निर्णय प्रमाणे मा.संचालक सो.नगरपालिका प्रशासन वरळी मुंबई तसेच सहाय्यक संचालक तथा विभागीय आयुक्त साहेब यांच्या आदेशानुसार आस्थायी पदावर कायम करण्यात आलेले 13 कर्मचारी यांचे वारसास आज पावेतो वेळोवेळी मागणी करुन वेगवेगळे आंदोलन करुन विनंती अर्ज शासनस्तरावर प्रयत्न करुन ही जिल्हा प्रशासन नाशिक व नगरपालिका प्रशासन यांना अधिकार असुन ही लक्ष घालून मयत कामगार यांचे वारसा न्याय देत नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची वेळ आली आहे.

मा.ना.नगरविकास मंत्री सो.मुंबई मा.प्रधान सचिव.मा.संचालक सो.वरळी मुंबई मा सहा.संचालक तथा विभागीय आयुक्त सो.नाशिक रोड कार्यालय यांना समक्ष भेट घेतली असता महाराष्ट्र शासनाने अनुकंपाचे परिपत्रक काढले आहे त्या प्रमाणे न.प.प्रशासन यानी पाठपुरावा करुन जिल्हा प्रशासन यांनी निर्णय घेतला पाहिजे असे सांगितले तरी आज पर्यंत संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करुन ही न्याय मिळत नसल्याने सोमवार दिनांक. ५ ऑक्टोबर 2020 पासून मनमाड नगरपरिषद कार्यालया खाली मयत कामगार यांचे वारसदार यांना अनुकंपा तत्वावर नोकरी वर सामावून घेण्यात यावे.

जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासन यांच्या स्तरावरील अनेक वर्षांपासून वेळोवेळी मागणी करुन ही प्रलंबित राहिलेल्या मागण्या करिता सुरक्षित अंतर ठेवून अमरण उपोषण करीत आहेत.

रास्त व प्रलंबित मागण्यात –

मनमाड नगर परिषद मयत कर्मचारी यांचे वारसास वारस हक्क अनुकंपातत्वावर नोकरीवर सामावून घ्यावे

मनमाड नगर परिषदेच्या अस्थापनेवरील वरिष्ठ लिपिक वर्ग-3 या पदावरील न.पा.च्या पात्र कर्मचारी यांना पदोन्नती देण्यात यावी.

12 वर्षे पदोन्नती अश्वासित प्रगती योजना च्या लाभा पासून वंचित ठेवलेल्या वर्ग 3 च्या ६ कर्मचारी यांना 12 वर्षे पदोन्नतीचा लाभ मिळावा व ज्या कामगारांना काही दिवसा पूर्वी पदोन्नती लागू केली त्यांच्या तारखाची तफावत दुरुस्ती करुन फरक अदा करावा.

७ व्या वेतन आयोगाच्या फरकाचा पहिला हप्ता शासन निर्णया प्रमाणे लवकरात लवकर मनमाड नगर परिषद कर्मचाऱ्यांना देण्यात यावा.

७ वा वेतन आयोग लागू झाल्याचे वेतन निश्विती पत्र (पे फीक्सेशन) कर्मचाऱ्यांना मुख्याधिकारी यांचे स्वाक्षरीने देण्यात यावे.

गेल्या ६ ते ७वर्षा पासून संघटना मागणी करीत आहे की, वेतन चिट्ठी संगणीकृत सर्व मनमाड नगर परिषद कामगारांना देण्यात यावी. अशी मागणी करण्यात आली यावेळी.
काॅ. किशोर आहिरे. अध्यक्ष. काॅ.सुभाष केदारे. उपाध्यक्ष काॅ.जाॅनी जाॅर्ज कार्याध्यक्ष कॉ. रामदास पगारे जनरल सेक्रेटरीउपस्थित होते.