
🔸गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यात भगवा ग्रुप ची बैठक…!
✒️नितीन रामटेके(गोंडपिपरी तालुका प्रतिनिधी)
मो:-8698648634
गोंडपिपरी(दि.7ऑक्टोबर):- भगवा ग्रुप, चंद्रपूरच्या वतीने गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांची सामाजिक समस्या आणि संघटन बैठक नवेगाव मोरे येथे घेण्यात आली.सध्या कोरोना या महामारीने संपूर्ण जगभर थैमान घातले आहे. त्यामुळे गल्ली ते दिल्ली सर्व सामान्य जनतेचे हाल झालेले आहे. तसेच महापुराने घातलेल्या वेढ्याने शेतकरी वर्ग संपूर्ण कर्जबाजारी झालेला आहे.
वाढता भ्रष्टाचार त्यामुळे सामान्य जनतेच्या होणारे हाल अश्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात आली. या आढावा बैठकीमध्ये सामान्य जनतेचे प्रश्न कश्याप्रकारे सोडविण्यात येतील याविषयी भगवा ग्रुप चे जिल्हाध्यक्ष संदीप श्रीहरी पोळे यांनी पदाधिकारी व उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. व सामान्यांच्या समस्यां निराकरणासाठी भगवा ग्रुप सदैव जनतेच्या पाठी राहणार असे आश्वासनही देण्यात आले.
या वेळेस भगवा गृप चे जिल्हाध्यक्ष संदीप श्रीहरी पोळे, उपाध्यक्ष आशिष बोन्डे, महामंत्री चेतन पाल, विद्यार्धी सेना अध्यक्ष वैभव हिंगाने गोंडपिपरी तालुका अध्यक्ष निखिल विरुटकर, पोंभुर्णा तालुका अध्यक्ष हर्षद ढवस तसेच इतर पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.