🔺14 वर्षीय मुलगा जागीच ठार

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.7ऑक्टोबर):-पोहणेर रस्त्याने माती घेऊन सिरसाळ्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या टिप्पर एका 14 वर्षीय मुलास जोरात धडक दिली यात त्या मुलाचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात बुधवार दि 7 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास घडला.

ईश्वर दत्ता राठोड वय 14 वर्ष रा घन्हाळ तांडा ता परळी असे मयत मुलाचे नाव आहे.ईश्वर हा त्याच्या सायकल वरून सिरसाळ्या कडून घरी जात असताना एका वीटभट्टी जवळ माती घेऊन येणाऱ्या MH 12 FC 8164 या क्रमांकाच्या टिप्पर ने समोरून जोरात धडक दिली. त्यात सायकल सह टिप्पर खाली गेल्याने मुलाचा जागीच मृत्यु झाला.

अपघाताची माहिती कळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत टिप्पर वर दगडफेक करीत काचा फोडून टाकल्या.
तणाव सदृशय स्थिती निर्माण होत असल्याचे लक्षात येताच सिरसाळा पोलिसांनी दंगल नियंत्रणपथकास बोलावून घेतले.
पंचनामा करून रात्री साडेआठ च्या सुमारास मयताची उत्तरीय तपासणी सिरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली.

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED