नायगाव पंचायत समितीत दारू पिऊन धिंगाना करणाऱ्या लिपिकास निलंबित करा – विक्रम पाटील बामणीकर

8

🔹मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

✒️नायगाव चांदु आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

नायगाव(दि.8ऑक्टोबर):- पंचायत समितीचे दारुडे लिपिक श्री ऋषी धर्मापुरीकर यांनी दिनांक ०५ रोजी कार्यालयीन वेळेत दारू पिऊन पंचायत समिती नायगाव कार्यालयात मारामारी करून गोंधळ घातल्यामुळे त्यांच्याविरुद्ध तात्काळ बडतर्फ करण्याची कारवाई व त्यांच्या विरोध शिस्तभंग कारवाई करावी त्यांना तात्काळ शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अन्यथा शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद नांदेड समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

गेल्या अनेक वर्षापासून पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री माधव केंद्रे यांच्या काळात अशाप्रकारे अनेकदा घटना पंचायत समिती कार्यालयात घडत होत्या पण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी आतापर्यंत कुठल्याही गोर गरिबाचे काम त्यांनी व्यवस्थित केले नसल्यामुळे कर्मचारी कामावर दारू पिऊन हजर राहत होते पण नव्याने रुजू झालेले गट विकास अधिकारी श्री फाजेवाड साहेब यांनी पदभार स्वीकारल्यापासून पंचायत समितीला चांगले दिवस आल्यासारखे व गोरगरीब जनतेचे कामे स्वतः गटविकास अधिकारी फाजेवाड हे करत आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षात नायगाव पंचायत समिती ही बोगस आणि भ्रष्टाचाराचे कुरण झाल्याचे नायगाव तालुक्यात नव्हे तर नांदेड जिल्ह्यात नायगाव पंचायत समिती चर्चेचा विषय ठरली होती. पंचायत समिती कार्यालयाचे लिपिक कार्यालयीन वेळेत व ड्युटीवर असताना दारू पिऊन तूर नसेत असतात व अनेकांना मारपीट करतात त्यामुळे त्यांना पदावरून तात्काळ निलंबित करून एक चांगला व जनतेचे कामे करणारा सेवक त्याठिकाणी नेमण्यात यावा.

गटविकास अधिकारी यांच्या केबिन समोर शिपाही कंधारकर व मोईनला शिवीगाळ करत मारहाण केलेल्या दारुड्या लिपिकाच्या प्रकारामुळे नायगाव पंचायत समिती कार्यालयात एकच गोंधळ उडाला या प्रकारामुळे पंचायत समिती या कार्यालयात नागरिक व शेतकरी गोरगरीब जनता त्यांचे काम करण्यासाठी चकरा मारत आसतात त्यांचे रोजचे व्यवहार सोडून त्यांचे शासकीय कामासाठी पंचायत समितीचे खेटे नागरिक घालत असतात. जर पंचायत समितीतील कर्मचारीच असे दारू पिऊन नसे मध्ये गुंग असतील तर तो सामान्य जनतेची काय कामे करतील ? हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे अशा दारुड्या व भांडखोर व गुन्हेगारी वृत्तीच्या कर्मचाऱ्या विरुद्ध तात्काळ कार्यवाही होणे हे जनहितार्थ अत्यंत गरजेचे आहे.

त्यामुळे शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे त्या लिपिकास तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनावर विक्रम पाटील बामणीकर जिल्हाप्रमुख नांदेड, भाऊसाहेब पाटील चव्हाण तालुकाप्रमुख नायगाव, शिवाजी पाटील शिंदे तालुका उपाध्यक्ष नायगाव, यांचा स्वाक्षर्‍या आहेत दिलेल्या निवेदनाच्या प्रति मा जिल्हाधिकारी साहेब नांदेड मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड व मा. गटविकास अधिकारी पंचायत समिती नायगाव यांना माहितीस्तव पाठविण्यात आल्या आहेत.

वरील लिपिकास तात्काळ सेवेतून बडतर्फ न केल्यास शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही शिवराज्य युवा संघटनेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांना दिलेला आहे.