केद्र सरकार ने शेतकरी हिताचा कायद्या काढला तर राज्य सरकारने स्थगिती दिल्याने जातेगाव येथे महाराष्ट्र राज्यसरकारच्या विरोधात घोषणा देऊन आंदोलन

    45

    ✒️देवराज कोळे(गेवराई प्रतिनिधी)मो:-8532409595

    गेवराई(दि.8ऑक्टोबर):-केंद्र सरकारने शेतकरी कायदा काढुन शेतकर्याच्या हिताचे निर्णय घेतले होते परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने केद्राच्या शेतकरी हिताच्या कायदाला स्थगिती दिली आहे त्यामुळे गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे आज भाजपा परिवार च्या वतीने महाराष्ट्र राज्य सरकारने केद्राच्या शेतकरी कायद्यावर स्थगिती आणली महाराष्ट्र सरकायच्या त्या जि आर स्थगितीच्या प्रतिकात्मक पेपरची होळी करुन आंदोलन करण्यात आले.

    आदर्श पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब यानी केद्रात शेतकरी हितासाठी शेतकरी कायदा काढुन निर्णय घेतला असुन या कायद्याला महाराष्ट्र सरकारने विरोध करत स्थगिती आणली आहे शेतकरी विरोधी महाराष्ट्र राज्यसरकारच्या धोरना विरोधात महाराष्ट्रात सध्या आंदोलन व निषेध नोंदविण्यात येत असुन गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे कार्यसम्राट आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार व भारतीय जनता पार्टी बीङ जि अध्यक्ष राजेंद्र भैय्या मस्के याच्या नेञत्वाखाली आणी गेवराई भाजपा ता अध्यक्ष प्रकाश काका सुरवसे याच्या मार्गदर्शनाखाली जातेगाव भाजपा परिवार च्या वतीने दि 7 / 10 / 2020 रोजी सरपंच सतिश चव्हाण ,भाजपा युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण यांनी केद्र सरकार ने शेतकरी हिताचा काढलेल्या कायद्दाला राज्य सरकारने विरोध करत स्थगिती आणल्याने महाराष्ट्र सरकारच्या धोरना बद्दल व प्रतिकात्मक राज्यसरकारच्या जि आर ची होळी करुन आंदोलन करण्यात आले.

    यावेळी आदर्श पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब आगे बढो, आदर्श गृहमंत्री अमित शहाजी, मा देवेंद्रजी फङणवीस साहेब आगे बढो घोषना देत आंदोलन करण्यात आले मा पंतप्रधान नरेद्रजी मोदी साहेब याचे हात बळकट करण्यासाठी गावातील भाजपा पदाधिकारी यानी आंदोलन केले शेतकरी हितासाठी भाजपच पक्ष निर्णय घेऊन न्याय देऊ शकतो असे ही आंदोलनाला दरम्यान घोषणा देण्यात आल्या यावेळी आंदोलनक सरपंच सतिश चव्हाण सर .भाजपा युवा नेते तथा युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण, जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, सदिपान दादा चव्हाण, कल्याण वाघमारे, पञकार कालीदास काकङे, गणेश पवार, सुरेश चव्हाण, अंकुश तात्या चव्हाण, कदम , बाळासाहेब धोङरे, बाळासाहेब चव्हाण , चांभारे भरत , भागवत शेळके , गणेश चव्हाण, पाङु जाधव , राम कारके आदी उपस्थित होते यावेळी मंङळ अधीकारी कुरुरकर व तराठी निकाळजे याना निवेदन देण्यात आले तलवाङा पोलीस स्टेशनचे झिरके साहेब उपस्थित होते.