श्रीदत्त दिव्या निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांच्या वतीने कोरोना योद्धा गौरव पत्राचे वितरण

    48

    ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

    नांदेड(दि.8ऑक्टोबर):-श्रीदत्त दिव्यांग व निराधार सेवाभावी संस्था टाकवडे यांच्यावतीने शिरोळ तालुका राजापूर खिद्रापूर राजापूर वाडी येथील आरोग्य सेविका आशा वर्कर सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावातील डॉक्टर यांना कोरणा योद्धा गौरवपत्र देऊन गौरवण्यात आले.

    जगावर एवढे मोठे कोरोनाचे covid-19 संकट आले असताना सफाई कामगार आरोग्य सेविका आशा वर्कर व गावातील डॉक्टरांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या आरोग्याची तपासणी करून या कोरोनाच्या covid-19 आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले त्याबद्दल त्याची दखल श्री दत्त दिव्यांग व निराधार संस्था टाकवडे यांनी घेऊन त्यांना सर्वांना कोरोना covid-19 योद्धा प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.

    यावेळी खिद्रापूर राजापूर वाडीवर राजापूर गावचे सर्वच डॉक्टर सरपंच ग्रामपंचायत सदस्य आरोग्य सेविका आशा वर्कर यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष पृथ्वीराज यादव साहेब हजर होते तसेच राजापूर चे सरपंच संजय पाटील राजापूर चे सर्व ग्रामपंचायतचे सदस्य व श्री दत्त दिव्यांग निराधार सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपाध्यक्ष सुरेश माळी सेक्रेटरी सुशिला पुजारी व संचालिका अश्विनी पाटील सुनिता पाटील सर्व हजर होते.