हाथरस युवतीवरील बलत्कार आणि हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करा – वकील संघ कळमनुरी

7

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

सेनगाव(दि.8ऑक्टोबर):-उत्तरप्रदेशच्या हाथरस येथिल युवतीवर बलत्कार करून अमानुषपणे तीची जिभ कापून निर्देयीपणे हत्या केली आणि अमानवीय पणे कुटुंबीयांच्या विरूध्द जाऊन पोलीसांनी अर्ध्या राञी संस्कृती व रितीरिवाज पायदळी तोडवून मृतदेहावर अत्यंविधी केला.या घटनेचा कळमनुरी वकील संघाच्या वतीने तीव्र निषेध करून महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी श्री.प्रशांत खेडेकर यांच्या मार्फत आज दि.७ आँक्टो २०२० रोजी निवेदन देण्यात आले.

हाथरस बलत्कार व हत्या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीशा मार्फत चौकशी करून गुन्ह्यातील आरोपींना कडक शिक्षा करून दोषी प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली.

या शिष्टमंडळात वकील संघाचे अध्यक्ष ॲड .ईलियास नाईक ,माजी अध्यक्ष ॲड .रवि शिंदे ,ॲड .विश्वनाथ चौधरी ,सचिव ॲड .विवेक दैठणकर ,उपाध्यक्ष ॲड .सुनिल घोंगडे ,सहसचिव ॲड .अमोल डिग्गीकर ,ॲड .अजरोद्दीन कादरी,ॲड .अश्रफी ,ॲड .मोहम्मद एकबाल ,ॲड .शाकेर सिद्दीकी ,ॲड .सिरसाट , ॲड .मझरअली जामकर, ॲड .सतीश पंडीत ,ॲड .जिंतुरकर,ॲड .मुदसर अश्रफी ,ॲड .ईनामदार, ॲड .अविनाश काळे, ॲड .जे.आर.जाधव,ॲड .अरूण दांडेकर ,ॲड .नांगरे,ॲड .यश मुठाळ आदी वकील बांधव सामिल होते.