✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी(दि.8ऑक्टोबर):- तालुक्यातील ब्रम्हपुरी राष्ट्रीय ओ. बी. सी. महासंघातर्फे मार्फत ब्रम्हपुरी विभागातील खासदार अशोक नेते आणि पालकमंत्री विजय वडेट्टीवार , तसेच उपविभागीय अधिकारी, आणि तहसीलदार साहेबांना, निवेदन देण्यात आले. ओबीसीचा मराठ्यांच्या आरक्षणाला कोणताही विरोध नाहीं. परंतु मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये व इतरही खलील मागण्याचे निवेदन देण्यात आले.

1.ओबीसी समाजाच्या प्रामुख्याने राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्याकडे प्रस्तावित करणाऱ्या मागण्या मांडल्या या मध्ये ओबीसी समाजाची 2021 मध्ये होऊ घातलेली जातिनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यात जातनिहाय जनगणना करून ओबीसी समाजात न्याय द्यावा.
2. ओबीसी समाजाला मिळत असलेल्या 19 टक्के आरक्षणातून मराठा समाजास कोणतेही आरक्षण देण्यात येऊ नये.
3. ज्या जिल्ह्यांमध्ये ओबीसींना 6, 11, 14 , 9 टक्के वर्ग तीन व चार पदा करीता आरक्षण आहे अशा जिल्ह्यात ओबीसींना 19 टक्के आरक्षण देण्यात यावे.
4. 100% बिंदूनामावली केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्वरित सुधारित करण्यात यावी.
5. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह सुरू करण्यात यावे.
6. महाज्योती करिता एक हजार कोटी रुपयांची लवकरात लवकर तरतूद करण्यात यावी.
7. ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटी रुपये मंजूर करण्यात यावे.
8. ओबीसी समाजाचा एक लाख रिक्त पदाचा अनुशेष भरण्यात यावा.
9. ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे.
10. ओबीसी समाजासाठी घरकुल योजना सुरू करण्यात यावी.
11. ओबीसी शेतकरी शेतमजुरांना वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
12. एसी, एसटी प्रमाणे ओबीसी शेतकऱ्यांना 100% सवलती वर राज्यात योजना सुरू करण्यात यावी.
13. एससी-एसटी प्रमाणे सर्व अभ्यासक्रमास शंभर टक्के शिष्यवृत्ती लागू करण्यात यावी.
14. ओबीसी विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी.
15. महात्मा फुले समग्र वांग्मय 10 रुपये किमतीत उपलब्ध करून देण्यात यावे.
16. राज्याच्या प्रत्येक तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी वाचनालय सुरू करण्यात यावे.
17. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात ओबीसी विभागीय कार्यालय सुरु करण्यात यावी, वरील सर्व मागण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळेस ब्रम्हपुरी तालुक्यातील ओबीसी समाजाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्र, विदर्भ, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED