तीन वर्षाच्या मुलीने एका मिनिटात 38 वेळा लावली जीभ नाकाला

32

🔸इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली नोंद

✒️शिरोळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)

शिरोळ(दि.8ऑक्टोबर):-नाकाला एका मिनिटात 38 वेळा जीभ लावून अनोखा रेकॉर्ड केला आहे तीन वर्षाच्या स्वरा नामदेव निर्मळे हिने. शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी मध्ये राहणाऱ्या स्वरा निर्मळे हिच्या रेकॉर्ड ची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड म ध्ये झाली आहे. या अगोदर स्वरांचे वडील नामदेव निर्मळे यांनी हि रेकॉर्ड केला होता. याबाबत बी न्यूज ने टाकलेला प्रकाशझोत.

शिरोळ तालुक्यातील टाकळीवाडी इथील नामदेव निर्मळे या शेतकऱ्यांने. लहान पणा पासून काही तरी वेगळं करायची आवड असणाऱ्या नामदेव ने वर्तमान पत्रात वाचले की एका माणसाने नाकाला एका मिनिटात 130 वेळा जीभ लावण्याचा रेकॉर्ड केलेली बातमी . हे वाचल्यावर आपण ही हे करू शकते यांची जाणीव झाल्याने नामदेव ने यांचा सराव करून एका मिनिटात 150 वेळा जिभ नाकाला लावून रेकॉर्ड केला. यांची नोंद ग्लोबल रेकॉर्ड मध्ये ही झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तीन वर्षांच्या स्वरा ने ही एका मिनिटात 38 वेळा जीभ नाकाला लावून नवा विक्रम केला. यांची दखल घेत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. याबाबत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड कडून पाठविण्यात आलेले प्रमाणपत्र, मेडल, टाॅफी लोगो, रेकॉर्ड बुक निर्मळे यांना मिळाले आहे. कोल्हापूर च नाव जगात भारी करण्यासाठी ही धडपड असल्याचे नामदेव निर्मळे सांगितले.

“श्री गुरुदत्त शुगर्सचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर श्री राहुल दादा घाटगे यांनी माझ्या घरी येऊन स्वरा नामदेव निर्मळे त्याचे वय तीन वर्षे 3 महिने 28 दिवस या वयात तिने एका मिनिटांमध्ये नाकाला जीभ अडतीस वेळा लावून तिचे रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंद झाले आहे आता तिचे आशिया बुक ऑफ रेकॉर्ड प्रोसिजर चालू आहे हिचा सत्कार केला यांच्या विशेष योगदानातून सहकार्यातून माझ्या मुलगी चे रेकॉर्ड इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली आहे.

यापूर्वी माझे एका मिनिटांमध्ये नाकाला जीभ 147 वेळा नाकाला जीभ लावून ग्लोबल रेकॉर्ड अँड रीसर्च फाउंडेशन मध्ये विश्वविक्रम केलो आहे जागतीक रेकॉर्ड हे एका मिनिटात 142 चे होते ते मी मोडलो आहे माझ्या वेळीदेखील श्री राहुल दादा घाटगे यांचे मोलाचे योगदान लाभले होते आज पर्यंत मला मोलाचे योगदान लाभले आहे सन 2013 मध्ये मी पेपरमध्ये वाचले होते की एक व्यक्ती एका मिनिटात 100 वेळा नाकाला जिभ लावून रेकॉर्ड करत आहे माझी वयाच्या पाचव्या वर्षी पासून नाकाला जिभ लागत होती पेपरमध्ये वाचल्यावर ही एक कला आहे व यातून एक रेकॉर्ड बनू शकतो हे मला कळालं मी सन 2013 पासून भरपूर जणांना सहकार्याबाबत भेटलो रेकॉर्ड संदर्भात चर्चा केलो फक्त लोक हसण्यावारी घेत होते कोणीही मला मदत केली नाही.

फक्त मी माझी कला लोकांच्या समोर सादर करायचो लोक फक्त हसायचे सहकार करूया फक्त असेच लोक सांगायचे प्रत्यक्षात मात्र कोणीच सहकार्य करत नव्हते अनेक मी राजकीय मंडळींना देखील भेटलो अनेक व्यक्तींना भेटलो काही फायदा होत नव्हता फक्त कला असून चालत नाही तर कलेला वाव देणारे लोक भेटले पाहिजेत हे माझ्या लक्षात आले सन 2019 मध्ये राहुल दादा यांचे मोलाचे सहकार्य लाभले मला त्यामुळे मी रेकॉर्ड करू शकलो माझी कला माझ्या दोन्ही मुलीसुद्धा आज आत्मसात केलेले आहेत चांगल्या पद्धतीने ते रेकॉर्ड करत आहेत.

गावचे तालुक्याचे जिल्ह्याचे महाराष्ट्र राज्याचे देशाचे नाव चांगल्या पद्धतीने भविष्यात कोरणार आहेत फक्त सहकार्याची भूमिका पाहिजे एवढेच मी सांगू इच्छितो कोणाच्यातरी सहकार्यातून मी आतापर्यंत रेकॉर्ड केलो आहे माझी आता गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड प्रोसिजर अंतिम टप्प्यात आहे फक्त हे राहुल घाटगे यांच्या मोलाचे योगदान घडत आहे दोन्ही मुलींची स्पॉन्सरशिप श्री राहुल दादा घाटगे यांनी घेतले आहेत.