उत्तरप्रदेशातील हाथरस येथील प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी

29

🔸भारतीय बौद्ध महासभा शाखा पुसदचे मा. महामहिम राष्ट्रपतींना निवेदन

✒️पुसद(पुरोगामी संदेश नेटवर्क)

पुसद(दि.8ऑक्टोबर):-उत्तरप्रदेशातील हाथरस, बलरामपुर बुलंद शहर, अजमेर, अजमगड येथील घटनेचा निषेध करून आणि तेथील जंगलराज सरकार बरखास्त करून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीचे निवेदन तहसीलदार साहेब पुसद यांच्यामार्फत महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले.

उत्तरप्रदेशातील हाथरस येथील १९ वर्षीय मनीषा वाल्मिकी या तरुणीवर १४ सप्टेंबर २०२०रोजी काही नराधमाने सामूहिक बलात्कार केला व त्यामुळे २९ सप्टेंबर २०२० रोजी तिचा मृत्यू झाला. तिचा मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन न करता तिचा मृतदेह उत्तरप्रदेश पोलिसांनी मध्यरात्री कुटुंबाची परवानगी न घेताच जाळला ही बाब कायदा व सुव्यवस्थेची हाणी करणारी आहे.तसेच प्रशासनाची हुकूमशाही व लोकशाहीला किती घातक आहे .याचे वास्तव चित्रण दिसून येते.

या सर्व घटनेला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री व प्रशासन जबाबदार असून गृहखात्याचा हलगर्जीपणा याला कारणीभूत आहे .या संपूर्ण घटनेची कठोर चौकशी करून अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्यात यावे व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी. या मागणीचे निवेदन मा. महामहीम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.

या निवेदनावर प्रचार व पर्यटन जिल्हा सचिव बौद्धाचार्य भगवान बरडे, तालुकाध्यक्ष माजी सैनिक भारत कांबळे ,जि.प.सदस्य भोलेनाथ कांबळे पं. स. सदस्य देवेंद्रजी खडसे, माजी सैनिक डि.जी.कांबळे, ल.पु. कांबळे, समाधान केवटे, भगवान खंदारे ,प्रफुल भालेराव, अनुताई डोंगरे, प्रज्ञा कांबळे ,सोनिया कांबळे, निर्मला सूर्यतळ ,ज्योती कांबळे, शोभा कांबळे ,लक्ष्मी डोके ,सयाबाई हरणे ,कांताबाई धुळे ,सरस्वतीबाई खाडे ,सरस्वती पडघणे, संगीता कांबळे ,कविता रंगारी, कल्पना मंडाले ,विजया कांबळे ,कांता धुळेकर, शंकर गावंडे, जयश्री इंगोले, संगीता इंगोले ,अश्विनी पठाडे, गंगाताई कांबळे, महिला शाखा सुदर्शन नगर, महाविर नगर ,सुभाष वार्ड, शिवाजी वार्ड, गांधिनगर येथील पदाधिकारी तसेच तालुका शाखेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.