मानवसेवा ट्रस्ट व AIMJF(मुंबई) तर्फे रोशन मस्जिद ला सोलार सिस्टीम अर्पण

  44

  ✒️पुणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

  पुणे(दि.8ऑक्टोबर):-मानवसेवा ट्रस्ट तर्फे रोशन मस्जिद (पुणे) येथे पर्यावरणाला मदत म्हणून सोलर पॅनेल बसविण्यात आले, व त्याचा उदघाटन व हस्तांतरण सोहळा तेहसीन पुनावाला यांच्या हस्ते झाले.

  यावेळेस बोलताना तेहसीन पुनावाला म्हणाले मुस्लिम समाजाने आपली सामाजीक कार्ये समाजापुढे निदर्शनास आणावी.
  पुण्यातील प्रसिद्ध दुलहा दुलहन कबरस्तान शेजारील रोशन मस्जिद नेहमीच सामाजिक कार्यासाठी पुढे असते यावर पर्यावरणाला मदत व वाढते लाईट बिल यावर मात करण्यासाठी उद्योजक रहीम भाई लखानी (ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन,मुंबई) यांच्या पुढाकाराने अल्ताफ पिरजादे यांच्या संकल्पनेने तसेच अस्लम मेमन यांच्या क्रयशक्तीने पुण्यातील भवानी पेठेतील ऐतिहासिक रोशन मस्जिद येथे सोलर प्लांट ची निर्मिती मानवसेवा ट्रस्ट, ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन (मुंबई) तसेच जमेतूल मुस्लिम रोशन मस्जिद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने साकारण्यात आले.

  सदर प्लांटचे उदघाटन युथ आयकॉन तेहसीन पुनावाला यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळेस रहीम लखानी, सीरत कमिटीचे प्रमुख हाफिज गुलाम कादरी, रोशन मस्जिद ट्रस्टी हाफिज इद्रिस , फिकरे ऊममत चे अब्दुल गफ्फार, जनवाडी मस्जिद ट्रस्टी रशीद शेख , सिराज बागवान सलीम शेख , अमजद खान, रियाज पिरजादे,एकराम शेख, हमीद शेख, आदी मनावर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन मानवसेवा ट्रस्ट तर्फे अध्यक्ष अल्ताफ पिरजादे , अस्लम बागवान अझीम विराणी यांनी केले.