
✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405
सिरसाळा(दि.8ऑक्टोबर):-सिरसाळा मोहा रस्त्यावर असणाऱ्या एका पाण्याच्या खदाणीत बुडून 7 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली.
कृष्णा चंद्रकांत वाघमारे वय 7 वर्ष असे मयत मुलाचे नाव आहे.
नांदेड जिल्ह्यातील माळेगाव येथील चंद्रकांत वाघमारे हे त्यांच्या पत्नी दोन मुलासह सिरसाळा येथील विटभट्टीवर
काम करण्यासाठी चार दिवसांपूर्वीच या ठिकाणी आले होते.
त्यांचा सात वर्षाचा मुलगा असणारा कृष्णा हा बुधवारी दुपार पासून गायब झाला होता या आशयाची माहितीही त्यांनी पोलिसांना देण्यात आली तर गुरुवारी सकाळी त्या मुलाचा मृतदेह खदाणीच्या पाण्या वर तरंगताना आढळून आला.
उत्तरीय तपासणी येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात केल्या नंतर सिरसाळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली.