मुख्यमंञी साहेब, सामाजिक न्यायमंत्री साहेब,दिव्यांगाना न्याय मिळेल काय?

  37

  ?चंपतरावडाकोरे पाटिल कुंचेलीकर यांचा निवेदनाद्वारे केला सवाल

  ✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

  नांदेड(दि.9ऑक्टोबर):- जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी न्याय मिळावा म्हणून दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी प्रशासन यांच्या कडे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र व ईतर दिव्यांग संघटनेच्या वतीने निवेदन, भेट चर्चा, अनेक प्रकारचे सनदशीर मार्गाने आंदोलन केल्यामुळे अनेक वेळा वरिष्ठ अधिकारी कनिष्ठ अधिकारी यांनी लेखी आदेश देऊन व पूर्वीचे मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी अनेक वेळा खातेप्रमुख व दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यां सहित मिटिंग घेऊन आदेश देऊन त्या आदेशाची अंमलबजावणी न करणार्‍या दिव्यांगाना त्यांच्या हक्कापासुन वंचित ठेवणार्‍या अधिकारी यांच्यावर योग्य ते कार्यवाही करावी व खालील मांगन्या त्वरित लक्ष घालून दिव्यांग वृध्द निराधार यांना न्याय द्यावा म्हणून वरिल मंञ्याना मा जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत निवेदनाद्वारे खालील प्रश्नाला मागितला न्याय

  1) दिव्यांग बांधवांचा जिल्हा परिषद अंतर्गत दरवर्षी दिव्यांग 5 टक्के राखीव निधी 2016 ते 2020 या कालावधीत मध्ये एक वर्ष वाटप केला तिन वर्षाचा निधी वाटप का करण्यात आला नाही?
  तर नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती ने दिव्यांग निधी एकदाही का वाटप केला नाही?
  २) दिव्यांग बांधवांचा जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायत येथील दिव्यांगाचा पाच टक्के निधी दरवर्षी का मिळत नाही ?
  ३) दिव्यांग वृध्द यांना डिसेंबर 2019 रोजी नांदेड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात मोजमाप साहित्य शिबिर घेऊन अद्याप वर्ष संपत असून त्यांचे साहित्य मिळत का नाही?
  ४) महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत दिव्यांग बांधवाना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा म्हणून मा. दिव्यांग आयुक्त यांनी दि.8 मे 2020 ला आदेश देऊन त्यांची अंमलबजावणी केली जात नाही
  , ५) दिव्यांग बांधवाना मा पालकमंत्री व जिल्हा अधिकारी साहेब यांच्या नेञत्वाखाली दिव्यांग मिञ नांदेड अँप ची स्थापना करून त्या अँप पासुन दिव्यांग वंचित राहु नये व त्यांची दि १४ जुलै ते 31 जुलै पर्यंत नाव नोंदणी व १ आँगस्ट ते 10आँगस्ट पर्यत छाननी व 15 आँगस्ट 2020 ला लाभार्थ्यांना लाभ मिळावा असेजिल्हाधिकारी साहेबांनी मर्यादा देऊन अंमल बजावणी वेळेत करण्याचे आदेश देऊन सुध्दा अनेक दिव्यांग अँपची अंमलबजावणी झाली नाही या अँप पासुन दिव्यांग बांधव वचीत राहात आहेत त्या आदेशाची अमलबजावणी का होत नाही.
  ६) मा.दिव्यांग आयुक्तमहाराष्ट्र राज्य यांचे पञ क्र 1011 दि 26 मार्च 2020 यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषद अंतर्गत ज्या दिव्यांग 60 टक्के अपंगत्व असेल अशा व्यक्तींना अतितीव्र निर्वाह भत्ता म्हणून दरमहा एक हजार वर्षाचे बारा हजार निर्वाह भता देण्याचे आदेश देऊन सुध्दा जिल्हा परिषद नेअंमलबजावणी केली गेली नाहीमहानगरपालिका नांदेड ने अंमलबजावणी केली.
  ७) नांदेड जिल्ह्यातील किती ग्रामपंकितीने दिव्यांग बांधवांचा राखीव निधी किती गावात देण्यात आला त्यां लाभार्थ्यासहित यादी देण्यात यावी म्हणून मा. ऊपमुख् कार्यकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद नांदेड यांना माहिती चा अधिकार दि.20 फ्रेबू2020 ला देऊन फक्त दोन तालुक्यातील प.स.ने अर्धवट माहिती दिली तर चौदा प. स. ने वरिष्ठांच्या आदेशाची व माहिती अधिकार निवेदनाची साधे उतर दिले नाही.

  मा.कर्त्व्यदक्ष मंञी, कर्तव्ये दक्ष वरिष्ठ अधिकारी यांनी या निवेदनाची दखल घेऊन दिव्यांगाना न्याय मिळावा म्हणून
  दिव्यांग वृध्द निराधार मार मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर ज्ञानेश्वर नवले,दिंगाबर लोणे, गजानन हंबर्डे, अशोक घायाळे,सदानंद गायकवाड, रंगनाथ भालेराव इत्यादी ने प्रसिद्ध पञक दिले.