अंबाजोगाई’च्या योगेश्वरी महाविद्यालयात अनुसूचीत जातींच्या प्राध्यापकांना व कर्मचारांना जुलमी वागणूक

7

🔸प्राचार्यांकडून घेतला माफीनामा

🔹स्वाभिमानी मुफ्टामुळे ” त्या” सर्वानांच मिळाला न्याय

✒️अंगद दराडे(बीड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-8668682620

बीड(दि.9ऑक्टोबर):-जिल्हातील आज 07 सप्टेंबर रोजी आंबेजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयात प्राध्यापकांना व कर्मचारांना गुलामगिरीची वागणून संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्यांकडून दिली जात आहे. याबद्दल वारंवार सुचना देवून सुध्दा ” कुञ्याचे शेपूट वाकडेच” त्यामुळे कुञ्याच्या शेपूट सरळ करण्यासाठी योगेश्वरीच्या मैदानात स्वाभिमानी मुफ्टा संघटनेने उतरावे लागले.

या संस्थेचे अध्यक्ष आणि प्राचार्यांने बेकायदेशीर तब्बेत सतरा प्राध्यापकांना कर्मचारांना आत्महत्यासाठी प्रवृत्त करण्यात येत आहे. यात बहुतांश अनुसूचीत जातीचे आहेत . या संस्थेमध्ये जातीभेदचे विष पेरले जात आहे, त्यांना फुले-शाहू-आंबेडकर-अब्दुल या विचारांच्या लोकांचा ञास होतोय. प्रत्येक्षात तर प्राचार्यांच्या डाव्याबाजूला असंख्य महापुरुषांची फोटो लावलेली दिसली . योगेश्वरी महाविद्यालयात महापुरुषांच्या विचारांचा देखाव-माल-फसाव-धंदा यांचा व्यवसाय चालू आहे.

याच योगेश्वरी शैक्षणिक मैदानात अनुसूचीत जातीच्या प्राध्यापकांना व कर्मचारांना बदनामी करुन विनयभंगाचे कटकारस्थान नियोजनपुर्वक रचण्याचे शडयंञ हे संस्थेचे अध्यक्ष व प्राचार्यांकडून जाणीवपूर्वक केले जात आहे . तसेच नौकरीतून काढण्याची धमकीचे कटकारस्थान रचले जात आहे. या महाविद्यालतील बहुतांश प्राध्यापकांनी हे कबूल केले आहे. हे सत्य आहे. आम्हाला वाचविले स्वाभिमानी मुफ्टा संघटनेच्या संस्थापाक अध्यक्ष प्रा. डॉ, शंकरराव अंभोर सरांनीच सतरा प्राध्यापकांच्या व कर्मचारांच्या कुटुंबांना स्वाभिमानी मुफ्टा संघटनेने आज न्याय मिळवून दिला.

तसेच योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्यांकडून येणार भविष्यकाळात कोणत्याही जाती-जमातीच्या प्राध्यापकांना किंवा कर्मचारांना जाणून-बुजून संस्थेकडून ञास, जातीभेद, , होणार नाही तसेच दिला जाणार ही नाही असे माफीनामा लेखी स्वरुपात घेतला. प्राध्यापकांना व कर्मचारांना अनुसूचीत जातीचे असल्यामुळे जातीभेद व जातीय ञास संस्थेकडून व प्राचार्यांकडून जाणून-बुजून ञास दिला जातोय. शिक्षणाचे माहेर घरात शिक्षकांना काळीमा लागणारी घटना घडतेय. एका नामांकित महाविद्यालयात अनेक वर्षा पासुन कार्यरत असणारे प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे यांच्या वर खोटा आरोप करत निलंबित केले होते.

हे प्रकरण विद्यापीठ व महाविद्यालय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे त्यांच्या बाजूने निकाल लागला. स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ. शंकर अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रकरण विद्यापिठ न्यायालयात १५ दिवसाच्या आत या प्रकरणाची सुनावणी करून डॉ.सुरेंद्र भिवगडे यांच्या बाजूने निकाल लागला व प्राचार्याला १०००/- रुपये दंड ठोठावण्यात आला.

महाविद्यालयांमध्ये मॅनेजमेंटचा हस्तक्षेप खूप मोठ्या प्रमाणात दिसून येतो.त्यामुळे याच्या अगोदर काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. प्राचार्यांना हाताशी धरत हेतुपुरस्सर बहुजन मागासवर्गीय प्राध्यापक कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न येथे होतो तसेच निलंबित केले जाईल, सक्तीच्या रजेवर पाठवले जाईल अशा पद्धतीने मानसिक त्रास दिला जातो. या महाविद्यालयात अनेक वर्ष काम केलेले प्रा.डॉ. भिवगडे यांच्या वर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्यांना संस्थेतून काढले होते.

अशा अन्याय करणाऱ्या शिक्षण संस्थांवर प्रशासक नेमावा अशी मागणी स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष डॉ शंकर अंभोरे यांनी केली. यावेळी प्रा. डॉ. सुरेंद्र भिवगडे, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे अध्यक्ष प्रोफेसर डॉ. शंकर अंभोरे, बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. धम्मपाल घुंबरे, बामुप्टोचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष डॉ. उमाकांत राठोड, डॉ मेश्राम , डॉ. मुंडे, प्रा. राहुल तायडे, प्रा.टडॉ. भगवान, प्रा.घवाडे, प्रा.मारुती तेगमपूरे बाळासाहेब लिहिणार, प्रा डॉ शफिक शेख, प्रा. डॉ. शांताराम रायपुरे, पुरोगामी शिक्षण संघटनेचे प्रा. चव्हाण, स्वाभिमानी मुप्टा संघटनेचे जिल्हा सचिव विक्रम धनवे, डॉ.राजाभाऊ कोरडे, प्रा. झुंझूर्डे , प्रा. भगत, प्रा, विणकर, प्रा. गायकवाड , प्रा. डॉ. संजय सावते, प्रा. झिंजुर्डे, डॉ. हिरवे, डॉ पाटेकर सह विविध शिक्षक संघटनेचे प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.