मराठा आरक्षणाच्या बंदला वंचितचा पाठिंबा – ॲड. प्रकाश आंबेडकर

    42

    ✒️समाधान गायकवाड(विषेश प्रतिनिधी)मो:-8552862697

    पुणे(दि.9ऑक्टोबर):- मराठा आरक्षणा संदर्भात येत्या १० ऑक्‍टोबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला वंचित बहुजन आघाडीचा जाहीर पाठिंबा आहे, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते पुणे येथे पत्रकारांशी बोलत होते.

    ओबीसी व मराठा आरक्षण हे वेगवेगळे आहे, ओबीसीमध्ये मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी मराठा नेते सुरेश पाटील व त्यांच्या टीमने करू नये असे आम्ही त्यांना सांगितले आहे. आरक्षण संघर्ष समिती व इतर मराठा संघटनांनी आरक्षण मिळण्यासंदर्भात आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील सामंजस्यपणा बिघडण्याची शक्यता आहे व ते बिघडू नये म्हणून वंचित बहुजन आघाडीचा या बंदला पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.

    दोन्ही राजांचा बंदला पाठिंबा आहे असे दिसून येत नाही एक राजा तर बिनडोक आहे तर संभाजीराजे यांनी आरक्षण बाबत भूमिका घेतली हे जरी बरोबर असले तरी ते आरक्षण ऐवजी इतर गोष्टींवर त्यांचा अधिक भर असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे भाजपाने त्यांना राज्यसभेवर कसे पाठवले हा प्रश्न निर्माण होत असल्याचेही प्रकाश आंबेडकर यांनी उदयनराजे भोसले यांचे नाव न घेता सांगितले. अशी माहिती वंचितचे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांनी दिली.