🔺आज (9ऑक्टोबर) पहाटेची घटना

✒️रोशन मदनकर(ब्रह्मपुरी,तालुका प्रतिनिधी)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.9 ऑक्टोबर ):- ब्रम्हपुरी – आरमाॆरी मुख्य मार्गावर पहाटेला दोन मुलं फिरायला जात असताना, अज्ञात वाहनाने अपघात झाला. आणि अपघाती मुले मृत्युमुखी पडले.मृतक मुलांचे नाव प्रशांत सहारे (22) आणि रोहित चट्टे (22) हे दोघेही खरकाडा गावातील रहिवाशी आहेत.

या दोघांच्या अपघाताची माहिती कळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशांत च्या कुटुंबात सहा जणांचा तर रोहित च्या कुटुंबात चार जणांचा परिवार सुखाने नांदत असताना अचानक, अज्ञात वाहनाने मृतकाच्या परिवारावर दुःखाचे दिवस लादले आहे.

मृतक मुलांच्या जाण्याने मृतक परिवारात व खरकाडा गावात शोककळा पसरली आहे.पुढील तपास ब्रम्हपुरी पुलिस करीत आहेत.

महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED