
कधी तू~~रिमझिम झरणारी बरसात
कधी तू~~ चमचम करणारी चांदण्यात
कधी तू~~कोसळत्या धारा, थैमान वारा
……..बस अशीच काहीशी तू…खट्याळ, नटखट. तुझ्या लबाड डोळ्यातले ते मिश्किल भाव माझ्या उदास मनाला खुलवून जातात. तुझ्या त्या खट्याळ खोड्या मनाला मोहून जातात.
तू आलीच अशी सरसर…..तुझ्यात चिंब भिजवलं… हिरव्यागार तृणांची तू मखमली शाल बनली….तर कधी इंद्रधनूची कमान… तू नक्की कोण?….त्या तृणांवरचं छोटस फुल की टपोरं गुलाब!… तू तर फुलपाखरू….एका जागी कधी स्थिर नाही…क्षणात इथे तर क्षणात तिथे तू तर चंचलपरी…. नाकावरचा राग तुझा भुरकन उडून जातो…का रागावलो तेच विसरून जातो…तू प्रेमाचा खळखळ झरा…निवरीत वहात असतो…तुझ्या खळखळाटात घर गुंजत असते…. तुझा तो ओलावा ग्रीष्मात थंडावा देत असतो… तू म्हणजे उन्हात मिळालेलं आईस्क्रीम…. तू म्हणजे दुधावरची साय…. लोण्याचा गोळा….तर कधी खट्टा दही…हापुस आंब्याची गोड फोड…. तर कधी खट्टी कैरी…..तू म्हणजे परिमल चंदनाचा…..कधी पावसाच्या पहिल्या थेंबाचा सुगंध… तू म्हणजे फुलातला मकरंद….तू म्हणजे पौर्णिमेचा चंद्र….चांदण्यांची शीतल रात्र….तर कधी रविप्रभाची सोनेरी किरण…मस्तानी ही पडावी फिकी…असीम सौन्दर्याची तू राणी….तुझ्या एक एक अदांनी काळजाचे होते पाणी पाणी…तुझी मधुर वाणी चालवते कृष्णमोहिनी…..तुझी रसाळ मधाळ बोली….तर कधी नुसता तांडव….
तू नसतीस तर काय झाले असते?….या शारदात वसंत फुलला नसता….माझ्या मनाला तुझा चंदन मुलामा मिळाला नसता…..तू म्हणजे देवाने अलवार माझ्या ओंजळीत ठेवलेले ईशपुष्प!…..
…….बेरुखी ये जिंदगी युंही जीते
……..अगर तुम ना होते…..
तू आलीस सोनपावलांनी….अन घरा सोबत आयुष्य उजळून गेले….. तू आहेस म्हणून अर्थ आहे या जीवनाला….तू आहेस म्हणून आनंदाचं वार वाहत घरात….तुझ्या बडबडगीतानं मनाला सुख लाभतं….. छकुली तू आलीस जीवनात आणि जिनवबाग फुलली आमची…प्राजक्ताचा सडा अंगणात…..आणि वेलीवरती रातराणी बहरली…..
गुलमोहोर बनून तू मोहराव
कुशीत आमच्या तू फुलावं
सुखाच्या फुलांनी जीवन बहरावं
माझ्या बाळा तुला उदंड आयुष्य लाभावं
✒️लेखिका-प्रिती पाटील,मुंबई
▪️संकलन- प्रा.रावसाहेब राशिनकर (साहेब)९४०४३२२९३१ (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी)