जिल्ह्यातील रुग्णांना तात्काळ रुग्ण सेवा देण्यात यावी – सुनील ठोसर पाटील

41

✒️नवनाथ आडे(गेवराई,विशेष प्रतिनिधी)मो:-9075913114

बीड(दि.9ऑक्टोबर):- जिल्ह्यातील अनेक ठिकाणी रुग्णांना कोरोना मुळे मिळणाऱ्या सुविधा ह्या अपुऱ्या पडत असल्यामुळे व अनेक ठिकाणी फक्त रुग्णाला आठ ते बारा तास कुठलेही डॉक्टर, सिस्टर, सुविधा सेवा न मिळाल्यामुळे अनेकांचे घाबरून जीवन संपले आहेत. याला सर्वस्वी जबाबदार आरोग्य विभाग व आपली यंत्रणा जबाबदार असून कोटी रुपयांचा निव्वळ खर्च कुठे होतो.

वेळेवर जेवण आपण फक्त वेळापत्रक लाऊन रुग्णाची काळजी न घेता फसवणूक होत असताना रुग्ण मरणाच्या वाटेवर आपण सोडत आहात. व रुग्णांना उपचार कसा असतो याचा फलक व सविस्तर माहिती सेंटरच्या उपस्थितांशी संवाद साधला तर सांगता येत नाही. अनेक ठिकाणी अनेक रुग्णाचे फोन आल्यावर स्वतः जाऊन पाहिले तर उडवाउडवी एकायला मिळते. आपल्या कर्मचाऱ्याचा व रुग्णाचा कुठेही ताळमेळ लागत नाही, नसतो.

सरकारने आतापर्यंत रुग्णालयाला मिळालेली रक्कम व मिळालेल्या रकमेपैकी रुग्णांना किती खर्च झाला हे ही जाहीर करावे. पेशंट साठी सर्व सुविधा मिळाव्या, जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्र तत्काळ सुरू करून बंद असणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करण्यात यावे, व्हेंटिलेटर बीड जिल्ह्यातील अनेक ठिकाणी बंद असून ते तत्काळ सुरू करावे, उपचार कश्या पद्धतीने असतो याचे जाहीर पत्रक प्रसिद्धीस द्यावे.

आपण आरोग्य विभागात वेगवेगळ्या ठिकाणी भरती केली याचे सविस्तर काम व मानधन जाहीर करावे, कोरोना टाळण्यासाठी आपल्या मार्फत घरगुती उपाय जनजागृती करावी.
सर्वच साहित्य स्वरूपात सर्वच खरेदी व वितरण व्यवस्था कश्या पद्धतीने होते हे जाहीर करावे. कोरोना या भीतीने सामान्य माणसाला बीड जिल्ह्यातील सर्व ठिकाणी डेकोरेटर यांच्या टी. व्ही. सुरू करण्यात याव्या वरील सर्व मागण्या बीड जिल्ह्यातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करून चौकशी करण्याची मागणी रयत शेतकरी संघटना बीड जिल्हा माध्यमातून आपल्याकडे मागणी बीड जिल्ह्यातील जनतेच्या सूचनेनुसार करण्यात येत आहे.

तत्काळ कार्यवाही करावी नसता यापुढे आपल्या कार्यालयासमोर ॲड. रवीप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उग्र आंदोलन करण्यात येईल. याची सर्वस्वी जबाबदारी आरोग्य प्रशासनावर राहील याची नोंद घ्यावी असे आवाहन सुनील नानासाहेब ठोसर पाटील बीड जिल्हा प्रमुख रयत शेतकरी संघटना सह बीड जिल्हा सचिव प्रमोद डोंगरे, बीड जिल्हा संपर्क प्रमुख पृथ्वीराज निर्मळ, युवक जिल्हा प्रमुख नईम अत्तर, बीड जिल्हा प्रमुख सविता दोडके, राम नवले, राजू मोरे, बाबुराव भोईटे, गणेश ढाकणे, आदित्य ठोसर, बीड जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप झोडगे. आदी पदाधिकऱ्यांनीही आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.