लोक आयुक्त कार्यालयाचे आदेश असूनही विभागीय कृषी सहसंचालक रमेश भताने वर गुन्हा का दाखल केला नाही ? – वसंत मुंडे

29

✒️आतुल बडे(परळी प्रतिनिधी)मो:-9096040405

परळी(दि.9ऑक्टोबर):-महाराष्ट्र मध्ये जलयुक्त शिवार घोटाळा बीड जिल्ह्याचा गाजला यामध्ये कृषी खात्याच्या दक्षता पथकाकडून दोन वेळेस चौकशी केली, त्यामध्ये सुरुवातीला 138 गुत्तेदार व मजूर संस्था तसेच 24 अधिकारी यांच्यावर एफ आय आर दाखल करून निलंबनाची कारवाई झाली.

तर दुसर्‍यांदा दक्षता पथकामार्फत पुन्हा चौकशी होऊन यामध्ये 6 अधिकारी 29 गुत्तेदार मजूर संस्था गुन्हे दाखल करायचे आदेश क्र.उ लो आ /कॉम/ 733 /2018/( टे 10 ) 5275 / 2020 दि. 12/ 3 /2020 ला सुनावणी झाली, त्यामध्ये रमेश भताने विभागीय कृषी सहसंचालक सेवानिवृत्त व उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ यांच्यासह गुन्हेा दाखल करण्याचे आदेश मा. लोक आयुक्त मुंबई 32 कार्यालयाकडून दि. 12/ 3 /2020 ला दाखल करण्याचे आदेश दिले.

परंतु आजतागायत गुन्हे दाखल का केला नाही? असा सवाल काँग्रेसचे नेते वसंत मुंडे चेअरमन श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार नाशिक यांनी आरोप केला आहे. कृषी खात्यामार्फत दक्षता पथकाने सर्व पुरावे भ्रष्टाचाराची लोकायुक्त कार्यालय कडे वर्ग केलेले आहेत तरी ही गुन्हे दाखल करण्यास विलंब का झालेला आहे याची कसुन चौकशी करण्याची मागणी वसंत मुंडे यांनी केली आहे.

सरकारने कृषी खात्यांतर्गत जलयुक्त शिवार ची घोटाळयाची चौकशी करण्यात आली त्यात गुतेदार व मजूर सहकारी संस्था 167 असून 31 अधिकारी हे भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत. अनेकांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे गुन्हे दाखल करण्यास विलंब होत आहे ,असा आरोप काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी केला आहे .परंतु राजकीय नेते सर्व स्तरातून अधिकारी व गुत्तेदार याना वाचविण्यासाठी हस्तक्षेप होत असल्यामुळे काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी लोक आयुक्त कार्यालयात दि. 14/ 12 /2018 ला अपील दाखल केले.

त्यानुसार आदेशही एफ. आय. आर .दाखल करण्याचे दि.12 /3 /2020 ला दिले ,परंतु आज तागायत एफ आय आर दाखल का केले नाही, यासंदर्भात पुन्हा दि.14/10/ 2020 ला ऑनलाईन सुनावणी होणार आहे .त्यावेळेस विभागीय कृषी सहसंचालक व पूर्वीचे जिल्हा कृषी अधीक्षक सेवानिवृत्त रमेश भताने सह उपविभागीय कृषी अधिकारी विष्णू मिसाळ व प्रभारी जिल्हा कृषी अधीक्षक पदभार त्यांनी अनेक वेळा घेतलेला आहे.

त्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर जलयुक्त शिवाराची नियमभाय बोगस कामे दाखवून बिले उचलल्या बाबत शासनाच्या कोणते निकषांचे पालन केले नाही दोन्ही चौकशीमध्ये दक्षता पथकामार्फत भ्रष्टाचार झाल्याचे जलयुक्त शिवारामध्ये बीड जिल्हा अंतर्गत सिद्ध झाला आहे. तरी तात्काळ पुणे दाखल करण्याचे आदेश देऊनही विलंब का लावला यासंदर्भात चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे नेते वसंत मुंडे यांनी लोक आयुक्त कार्यालयाकडे लेखी पत्रद्वारे विनंती करणार आहेत .