🔺जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे एकही मृत्यू नाही

🔺जिल्ह्यात बाधितांची संख्या 11 हजार 764

✒️चंद्रपूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

चंद्रपूर(दि.9ऑक्टोंबर):-जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या कमी होत आहे. तसेच बरे होणाऱ्या बाधितांची संख्या उपचार घेणाऱ्या बाधितांपेक्षा जास्त आहे. आतापर्यंत 8 हजार 436 बाधित कोरोना मुक्त झाल्यामुळे त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर उपचार घेत असलेले बाधित 3 हजार 148 आहे. गेल्या 24 तासात नव्याने 141 बाधितांची नोंद झाली असून 24 तासात एकही बाधिताचा मृत्यू झालेला नाही.

जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात आतापर्यंत 180 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 171, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

अशी आहे 24 तासात आढळलेल्या बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 70, बल्लारपूर तालुक्यातील चार, चिमूर तालुक्यातील 11, मुल तालुक्यातील 13, जिवती तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील पाच, ब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्‍यातील तीन, वरोरा तालुक्यातील एक,भद्रावती, सावली, सिंदेवाही तालुक्यातील प्रत्येकी सहा, राजुरा तालुक्यातील दोन, गडचिरोली दोन, वर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 141 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहर व परिसरातील निर्माण समिती परिसर, बालाजी वार्ड, बापट नगर, बाबुपेठ, शांतीनगर जुनोना चौक, पठाणपुरा वार्ड, घुटकाळा वार्ड, जगन्नाथ बाबा नगर, ऊर्जानगर, विठ्ठल मंदिर वार्ड, नगीनाबाग, इंदिरानगर, दादमहल वार्ड, आंबेडकर नगर, अंचलेश्वर वार्ड, कृष्णा नगर, जवाहर नगर, भिवापुर, लक्ष्मी नगर, रहमत नगर, शक्तिनगर, घुग्घुस, सुंदर नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील विद्या नगर वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, डब्ल्यूसीएल कॉलनी परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर, इंदिरानगर भागातून बाधित ठरले आहे.

वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील वाल्मिक नगर, शांतीनगर, सिव्हील लाईन परिसर, बेळगाव, गाडगेबाबा नगर, चिखलगाव, गुजरी वार्ड, भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.भद्रावती तालुक्यातील गुरु नगर, सुरक्षा नगर, किल्ला वार्ड, पोलिस क्वार्टर परिसरातून बाधित पुढे आले आहे.

सावली तालुक्यातील कापसी, अंतरगाव, बोथली भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव, गुंजेवाही परिसरातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील किटाळी, कोटगाव, गिरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्ड, टिळक वार्ड, नेहरू वार्ड, नेताजी वार्ड, भिसी, मदनापुर, रत्नापूर भागातून बाधित पुढे आले आहे. मुल तालुक्यातील राजोली परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.कोरपना तालुक्यातील गडचांदूर, साईबाबा मंदिर परिसर, माऊली मंदिर परिसर, कन्हाळगाव, भागातून बाधित पुढे आले आहे.

Breaking News, कोरोना ब्रेकिंग, चंद्रपूर, महाराष्ट्र, विदर्भ, स्वास्थ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

©️ALL RIGHT RESERVED