एसटी कामगारांना न्याय केव्हा मिळणार?

29

🔸आत्मक्लेश उपोषण आंदोलन

✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

हिंगणघाट(दि.9ऑक्टोबर):-महाराष्ट्र एसटी कामगार संघटना वर्धा विभाग येथे एसटी कामगारांचे मागील 3 महिन्याचे वेतन रखडलेले आहे. कामगारांनी आपला घर खर्च कसा भागवायचा असा प्रश्न कामगारांना पडलेला आहे. कोविड 19मध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची अत्त्यंत जिव्हाळ्याची लालपरी म्हणून कामगार आपली कामगिरी पार पाडत आहे.

महामंडळाचे इमाने इतबारे काम करीत असलेले कर्मचारीच जर उपाशी राहत असेल आणि त्याला वेळेवर जर वेतन मिळत नसेल तर त्यांनी आपला प्रपंच कसा चालवायचा. अनेक कर्मचारी बाहेरचे असल्यामुळे त्यांना रूमभाडे पण देणे शक्य होतं नाही. तसेच आरोग्य धोक्यात घालून आपली कामगिरी चोखपणे बजावीत असतांना त्यांना वेळेवर वेतन दिले जात नाही.

जुलै. ऑगस्ट. सप्टेंबर अश्या तीन महिन्याचं वेतन न देता. एक महिन्याचे वेतन देऊन प्रशासनाने कर्मचाऱयांच्या तोंडाला पाने पुसली आहे. जर नफा ना तोटा या तत्वावर एसटी सरकार चालवीत आहे तर त्या कामगारांना सवतीची वागणूक का दिल्या जाते. हा मोठा प्रश्न कामगारांना पडलेला आहे. म्हणून एसटी ही राज्य शासनांत विलीन करून कामगारांना योग्य न्याय द्यावा व रखडलेले दोन महिन्याचे वेतन देऊन कामगारांना ऊर्जा द्यावी.

करिता महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे तर्फे आत्मक्लेश उपोषण विभागीय कार्यालया समोर करण्यात आले.अशी माहिती शम्मी पठाण (सचिव -महाराष्ट्र एसटी कामगार संघटना हिंगणघाट आगार.)यांनी दिली