जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या तातडीने पूर्ण करा

42

🔸विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदामभाऊ राठोड यांची मागणी

✒️सय्यद शब्बीर जागीरदार(विशेष प्रतिनिधी)मो:-९६२३८९६५७४

जिवती(दि.9ऑक्टोबर):-विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदामभाऊ राठोड जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांची समस्या घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपुर येथून पालकमंत्री चंद्रपुर व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन पाठविण्यात आले.

निवेदनात जिवती तालुक्यातील भूमीहीन शेतकऱ्यांना शेतीचे जमीन पट्टे मिळणेबाबत जिवती तालुक्यातील शेतकरी वर्ग हे १९५० ते १९५५ पासून शेती व्यवसाय करतात.आणि या शेतीच्या आधारावर त्यांचा उदरनिर्वाह करतात त्यामध्ये निसर्गाच्या आधारावर शेती अवलंबून आहे.त्यामध्ये प्रत्येक वर्षी येणाऱ्या दुष्काळाला दोन हात करण्याचे काम आम्हा शेतकऱ्यांना करावा लागतो.

त्यामध्ये आम्हाला महाराष्ट्र शासनाचा कोणताच लाभ उपभोगता येत नाही कारण आमच्याकडे आमचे मालकी हक्काचे जमिनपट्टे नाही आमचे गाव महसूल मध्ये आहे आमच्याकडून वन कर पण वसुली केली आहे.

भूमीहीन शेतकऱ्यांना जमीन पट्टे मिळायलाच पाहिजे,कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तर मग शासनाचा पण कर्तव्य बनतो की भूमीहीन शेतकऱ्यांची योग्य दखल घेऊन जमिनीचे योग्य ती रीतसर निरीक्षण करून योग्य शेतकऱ्यांना जमीन पट्टे देण्यात यावे,आदी मागण्याचा समावेश आहे.

शेतकऱ्यांची जमीन पट्टेची दखल शासन प्रशासन नाही घेतली तर विदर्भ राज्य आंदोलन समिती व विदर्भ राज्य युवा आघाडी तीव्र आंदोलन करेल. असा इशारा विदर्भ राज्य युवा आघाडी अध्यक्ष सुदामभाऊ राठोड व त्यांच्या समवेत कार्यकर्त्यांनी दिला.