2 नोव्हेंबरला बेरोजगार दिव्यांगांचे विद्रोही आंदोलन

61

🔹अधिका-यांना “रत्ताळे” देत काठ्या – लाठ्या कुबड्या आणि चष्मा भेट

🔸राहुल साळवे.अध्यक्ष बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेड यांनी दिली माहिती

✒️माधव शिंदे(नांदेड,जिल्हा प्रतिनिधी)मो:-7757073260

नांदेड(दि.10ऑक्टोबर):- शासन स्तरावरून दिव्यांगांच्या कल्याण व पुनर्वसनासाठी दरवर्षी विविध कल्याणकारी व वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या जातात परंतु त्या योजणांची आणि शासन निर्णयांची नांदेड जिल्ह्यात काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्यामुळे बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समितीचे अध्यक्ष राहुल साळवे यांनी शेकडो दिव्यांगांना सोबत घेऊन गत अनेक वर्षांपासून लोकशाही मार्गाने विविध आक्रमक आंदोलने करत लढा देत संघर्ष सुरू केला.

त्यात बर्यापैकी न्याय हि मिळाला परंतु शासकीय अधिकार्यांच्या बदल्या आणि दिव्यांगांप्रती उदासिनता यामुळे दिव्यांग शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दुरच राहिला एवढेच काय तर कोरोना या महामारीच्या काळातही दिव्यांगांवर उपासमारीचीच वेळ या सर्वांगाने दिव्यांगत्व धारन केलेल्या शासकीय अधिकाऱ्यांनी आणली याच्याच निषेधार्थ बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती नांदेडकडुन दि 9 आक्टोंबर 2020 रोजी महामहीम राष्ट्रपती.पंतप्रधान.राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना एकुण 19 मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आणि या निवेदनात असे म्हटले आहे.

कि दि 2 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय.महानगरपालिका कार्यालय आणि जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे एकाच क्षनी विविध प्रकारचे विद्रोही आंदोलने करून अधिका-यांना “रत्ताळे” आणि दिव्यांग साहित्य ज्यात अंध काठी.अंध चष्मा.कुबडी.लाठी.मुकबधीर – कर्णबधीर मशीन भेट देण्यात येणार आहोत.या निवेदनावर राहुल साळवे.नागनाथ कामजळगे.अमरदिप गोधने.संजय धुलधाणी.अब्दुल माजीद शेख चांद, कार्तिक भरतीपुरम, प्रदिप हणवते, सय्यद आरीफ सय्यद अली आणि मुंजाजी कावळे यांच्या सह्या आहेत.

तसेच या आंदोलनात जास्तीत जास्त दिव्यांगांनी सहभागी होण्याचे आवाहन सुनील जाधव,रवि कोकरे,व्यंकट कदम,आत्माराम राजेगोरे,संतोष पवार,वैभव पईतवार,भोजराज शिंदे, जयपाल आडे,आनंदा माने, विष्णु जायभाये,भाऊसाहेब टोकलवाड, विठ्ठल सुर्यवंशी, गणेश वर्षेवार,सतीश सरोदे,कमलबाई आखाडे,गोदावरी जंगीलवाड,भाग्यश्री नागेश्वर,मनिषा पारधे, कल्पना सप्ते आणि सविता गावटे यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.