परम आदरणीय केशवदासजी रामटेके गुरुजींना,भावपूर्ण श्रद्धांजली

24

✒️गडचिरोली(पुरोगामी संदेश नेटवर्क)

गडचिरोली(दि.10ऑक्टोबर):-गुरुदेव सेवा मंडळाच्या तत्त्वज्ञानानुसार आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलेले परम आदरणीय केशवदास जी रामटेके गुरुजी यांचं निधन म्हणजे गुरुदेव सेवा मंडळाची फार मोठं नुकसान आहे.

आदरणीय रामटेके गुरुजीनी खऱ्या अर्थाने कीर्तनकार घडवलेत, महिला कीर्तनकार सुद्धा घडवले त ग्रामगीतेचा प्रचार आणि प्रसार अतिशय वेगळ्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांनी केला.
दुर्दैव येथे सुद्धा सजनाला त्रासच काही तथाकथित लोक त्यांना जन्मभर दुय्यम पद्धतीची वागणूक देत तरी त्यांनी सहन केली.
त्याबद्दल अवाक्षरही ते बोलत नसत, एका त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मोझरी येथील बऱ्याच जणांना या बाबतीत बोललो परंतु… तोंडात सदैव मुग धरलेले लोक काय बोलतील.

शेवटी प्रर्यंत देहातीत हा महात्मा केव्हाही कोणाबद्दल ही एक शब्द त्यानी बोलले नाहीत. मानवतेचे महान पुजारीवंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करणारे कर्मयोगी संत परमपूज्य तुकारामजी दादा गीताचार्य, साहित्यरत्न सुदामजी दादा सावरकर, परमपूज्य मोकदमजी
दादा, परमपूज्य रामकृष्णदादा बेलूरकर व परमपूज्य परम आदरणीय केशवदास जी रामटेके गुरुजी व त्यानंतर परम आदरनिय घुसरकर महाराज, परम आदरणीय अच्युत महाराज, परम आदरणीय अत्रे महाराज असे महान प्रचार प्रसार करणारे आदर्श प्रचार प्रचारकांच्या नंतर एकला चलो रे या पद्धतीने त्यानी आदर्श प्रचार यंत्रणा राबवली, ग्रामगीतेवर त्यांनी महाराष्ट्रातून परीक्षा राबवल्या.

साहित्याच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप सेवा केली,
गुरुपुत्र रामटेके गुरुजीना लोकही त्यांना त्याच उंचीवरून सन्मान देत.आपली ही निस्पृह सेवा गुरुदेव सेवा मंडळाच्या सामान्य सामान्य प्रचारक विसरणार नाही, आपल्या सर्वांच्या हृदयात आहात.

मराठवाड्यातून प्रचारक मंडळ झाली किती खूप आनंदाने येऊन भेटत बोलत विचारपूस करत जुना प्रचारका संदर्भात बोलत, खूप आठवणी… खूप प्रेम असे प्रेम करणारे फार क्वचित लोक असतात.

त्यांचा एक मोठा सन्मान सोहळा करण्यात आला त्यामध्ये मी स्वतः अतिशय दुःखात मध्ये होतो, तेव्हा मी येऊ शकलो नाही ही खंत माझ्या जीवनात राहील. मातृहृदयी,गुरुपुत्र रामटेके गुरुजी आपण सर्वांच्या हृदयात आहात आपल्या चरणी कोटी-कोटी वंदन.
💐💐💐💐💐🙏🙏🙏
-बालाजी गाजेवार, गुरुदेव सेवा मंडळ, नांदेड.