🔹राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे निवेदन

✒️कोल्हापूर(पुरोगामी संदेश नेटवर्क)

कोल्हापूर(दि.11यऑक्टोबर):-राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय कोल्हापूर जिल्ह्यच्या वतीने व जिल्हा अध्यक्ष श्री विश्वजित कांबळे साहेब यांचे नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश येथे मनीषा वाल्मिकी या दलित मुलीवर काही नराधमांनी पाशवी बलात्कार करून खून करणेत आला त्याच्या निषेधार्थ निदर्शन करून सदर आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व मृत मुलीला न्याय मिळावा, तसेच, कामगार व शेतकरी विरोधक धोरणा विरोधात कोल्हापूर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष श्री सोमनाथ कांबळे, महिला अध्यक्षा श्रीमती शीतल तिवडे, सुमन सुलगावकर, जिल्हा सरचिटणीस श्री दादासाहेब चोपडे, जिल्हा उपाध्यक्ष महेश कांबळे,उपाध्यक्ष अन्नपा खमलेहत्ती, शहर अध्यक्ष रामचंद्र भाले, इचलकरंजी शहर अध्यक्ष श्री सुरेश माने, अमित कांबळे,वैभव सुरवंशी,महादेव कांबळे,कृष्णा कांबळे,जयदीप वरवडेकर, नचिकेत कांबळे, आकाश भास्कर, बळवंत कांबळे, राजाराम वारे, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र, सामाजिक 

©️ALL RIGHT RESERVED