वंचित बहुजन समाजाचं सर्वसमावेशक दुरदृष्टी असलेलं एकमेव नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर

26

मा.बाळासाहेब आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. अशावेळी मौन बाळगणे अनेक नेते फायद्याचे समजतात. मात्र “आमचे मराठा आरक्षणाला समर्थन असून ओबीसी आणि इतर कुठल्याच आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्यात यावं”, असे विधान त्यांनी केले आहे. मराठा मूक मोर्चादरम्यानही “हे मोर्चे बहूजनांच्या विरोधातील नसून कुठेही त्याविरोधात मोर्चे काढण्यात येऊ नयेत,” अशी भूमिका त्यांनी घेतली होती.

धम्म’ म्हणून असलेली आचारसंहिता ही निर्विवाद वेगळी असली तरी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर म्हणून ते वारकरी सांप्रदायाच्या मागण्यांना पाठींबा देत पंढरपूरात जाऊन धडकलेत. ही काही साधीसुधी घटना नव्हती.’आम्ही हिंदूंचे विरोधक नाही’ हे स्पष्ट करण्याचा तो प्रयत्न होता.घटनेतील समतेचे तत्त्व जगणारे असे किती नेते सध्या महाराष्ट्रात दिसतात ? जात आणि धर्मांमध्ये वितुष्ट निर्माण करून … धृवीकरण करून राजकारण करणारे अनेक पक्ष आणि नेते आहेत. परंतु अशावेळी भूमिका घेणारं कुणीच कसं ठामपणे समोर येत नाही ? कारण सत्य काय आहे, यापेक्षा आपला राजकीय फायदा कशात आहे, हेच त्यांच्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे.

देशावर खरं प्रेम असणं म्हणजे हा देश एकसंध राहण्यासाठी झटणं आहे. राष्ट्रीय प्रतीकं आणि संविधानातील तत्त्वांचा सन्मान करतो, तोच केवळ देशभक्त असू शकतो. या पार्श्वभूमीवर देशभक्त कोण आणि देशद्रोही कोण, हे सजग भारतीय ओळखू शकतात. हिंदू विरुद्ध मुस्लीम, हिंदू विरूद्ध बौद्ध, मराठा विरुद्ध बौद्ध, ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष पेटवत ठेवून त्यावर आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे अनेक आहेत.

हाथरस घटनेच्या संदर्भात राहूलजी आणि प्रियंकाजी राजकारण करीत आहेत,असा आरोप होतो. बाळासाहेबांच्या संदर्भातही हे ते राजकारणासाठी करताहेत, असे कुणी म्हणेल. तर माझे म्हणणे हेच आहे की, होय !! राजकारणासाठी जर तुम्ही माणसं जोडण्याची, उपेक्षितांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि न्यायासाठी लढण्याची भूमिका घेत असाल तर अशा राजकारणाला सलामच !!

✒️लेखक:-किशोर बळी
( प्रसिद्ध लेखक,कवी, नाटककार,दिर्गदर्शक तथा ओबीसी नेते)
मो-9421677181

▪️संकलन:-नवनाथ पौळ
( पुरोगामी संदेश नेटवर्क केज तालुका प्रतिनिधी)
मो-8080942185