🔸समाजाच्या संतप्त भावना विचारात घेता सपोनि पंजाबराव राठोडसह तिघे निलंबीत

🔹दोंडाईचाला छावणीचे स्वरुप, समाज संतप्त, रात्री उशिरा अंत्यसंस्कार

✒️संजय कोळी(दोंडाईचा प्रतिनिधी)मो:-9075716526

दोंडाईचा(दि.11ऑक्टोबर):-येथील मोहन मराठे संशयास्पद मृत्यू पकरणात जोपर्यंत जबाबादार कारवाई होत नाही , तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही , अशी भूमिका घेत मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी रात्री इनकॅमेरा शवविच्छेदनानंतर मयतचेशव धुळ्याहून सरळ दोंडाईचा पोलीस स्टेशनला नेले होते .

याठिकाणी बॅरिकेटस लावून पोलिसांनी जमावाला बाहेरच रोखले . त्याठिकाणी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी जमाव समोर जाऊन सांगितले की , घटनेचा तपास आता सीआयडीकडे दिले आहे . तसेच प्रकरणाशी संबंधित सहायक पोलीस निरीक्षक पंजाबराव राठोड याच्यासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले असल्याची माहिती दिली . यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या शिष्टमंडळामध्ये माजी नगराध्यक्ष नानाभाऊ मराठे , माजी नगरसेवक विजय मराठे , नगरसेवक संजय मराठे , दिलीप शेळके , अॅड .प्रमोद मराठे , सामाजिक कार्यकर्ते रवींद्र जाधव उपस्थित होते .

तर यावेळी परिविक्षाधीन अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत , अप्पर तहसीलदार सुदाम महाजन स्थानिक अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत शिरपूरचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील ,दोंडाईचा पोलीस निरीक्षक आनंद कोकरे , नरडाणा योगेश राजगुरु , सांगलीचे अभिषेक पाटील , थाळनेरचे सचिन साळुके , दंगा काबू नियंत्रक पथक यात सोळा कर्मचारी यांचा बंदोबस्त तैनात करण्यातआला होता . चर्चेअंती मयतावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला .

महाराष्ट्र

©️ALL RIGHT RESERVED