पंचायत समिती चामोर्शी चा भोंगळ कारभार

36

🔹ग्रामपंचायत आष्टी चे प्रभारी ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे हे सांभाळत आहेत अवैध प्रभार

🔸माहिती अधिकार कार्यकर्ते जवाहर मासिरकर यांचा आरोप

✒️आष्टी(पुरोगामी संदेश नेटवर्क)

आष्टी(दि.12ऑक्टोबर):-ग्रामपंचायत आष्टी पंचायत समिती चामोर्शी चे प्रभारी ग्रामविकास अधिकारी इंद्रावण बारसागडे हे सदर ग्राम पंचायत आष्टी इथे प्रभारी म्हणून सन ऑक्टोंबर २०१८ पासून कार्यरत आहेत. सदर सचिव हे ग्रामपंचायत ठाकरी येथील मूळ नियमित स्वरूपाचे सचिव आहेत.अशातच ग्रामपंचायत ईल्लूर चे प्रभारी सचिव म्हणून सुध्दा पदभार साभाळीत आहेत.

असे असतांना एका सचिवाकडे तीन ग्रामपंचायत चा पदभार वरिष्ट अधिकाऱ्यांनी देणे यामध्ये वरिष्ट अधिकाऱ्याचा जाणूनबुजून वरहदस्त असून वरिष्ठ अधिकाऱ्याच्या कृपेने सदर ग्रामपंचायत मध्ये करोडो रुपयाची बांधकामे नाली, सी.सी.रोड,दूकान गाडे व इतर बांधकामे झालेली आहेत.सदर बांधकाम बाबत माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती सदर प्रभारी अधिकाऱ्याकडे मागितली असता कोणतेही माहिती सादर केलेली नाही. त्यामुळे सदर R.T.I कार्यकर्त्यानी वरिष्ठ अधिकाऱ्याकडे अपील दाखल केलेली आहे.

सदर प्रभारी अधिकार्यांचा पदभार बाबत R.T.I कार्यकर्ता जवाहर धोंडूजी मासीरकर यांनी वरिष्ट अधिकाऱ्याकडे माहिती मागितली असता पंचायत समिती चामोर्शी यांचे कार्यालयीन पत्र क्रमांक/ वसचा/जे सहा /७००५/२०२० दिनांक २८/०८/२०२० अन्वये ग्रामपंचायत आष्टी चे प्रभाराचे आदेश नस्तीला नसल्याची माहिती वरिष्ट अधिकार्यांनी सादर केली आहे.

तेव्हा ग्रामपंचायत आष्टी चे प्रभारी ग्रामविकास अधिकारी इंद्रावत बारसागडे सन ऑक्टोंबर २०१८ पासून कोणत्या आदेशान्वये पदभार सांभाळीत आहेत व सदर कालावधीत करोडो ची बांधकामे करीत आहेत ती सर्व कामे अवैध्य स्वरुपाची समजावी काय असा प्रश्न निर्माण होतो आहे.

सदर पदभारा बाबत व झालेल्या करोडो रुपयांची बांधकामा बाबत वरिष्ठ पातळीवरून एक समिती गठीत करून सखोल चौकशी व्हावी अशी मागणी R.T.I कार्यकर्ते जवाहर मासीरकर यांनी मा. ग्रामविकास मंत्री पालकमंत्री मुख्यकार्यापालन अधिकारी जि.प. गडचिरोली यांना निवेदना द्वारे केले.