🔺ब्रह्मपुरी तालुक्यातील दुखःद घटना

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

ब्रम्हपुरी (दि.12 ऑक्टोबर):- ट्रॅव्हल्स च्या अपघातात एक युवक जागीच ठार. सदर घटनेची माहिती याप्रमाणे महेश सुखरुजी सोनटक्के (33) हा ब्रम्हपुरी वरून पानोळी या आपल्या गावाला जात असताना अचानक ब्रम्हपुरी – नागपूर हायवेवर अड्याळ फाट्या जवळ भर धाव येणाऱ्या ट्रॅव्हल्स (एम. एच. 15.J.9099) आणि एम. एच .34BW 0767 या टूव्हीलर गाडीचा अपघात होवून महेश सुखरुजी सोनटक्के (33) हा युवक जागीच ठार झाला.

ही घटना जवळपास सायंकाळी 5.30 वाजताची आहे. मृतक युवक फर्निचर च काम करून आपल्या घरचा उदरनिर्वाह करीत होता. मृतक च्या पाठीमागे त्याची पत्नी, दोन मुलं व आई – वडील असा परिवार असून महेश च्या जाण्याने त्याच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळला असून परिवार व पानोळी गावात शोककळा पसरली आहे.घटनेचा पुढील तपास ब्रह्मपुरी पोलीस करीत आहेत.

Breaking News, महाराष्ट्र, विदर्भ

©️ALL RIGHT RESERVED