कोरपना प्रवाशी चे हाल, बस स्टॅड चे जमिन खरेदी भिजत घोंगडे ?

55

✒️संतोष मडावी(कोरपना,विशेष प्रतिनिधी)मो:-8698639446

कोरपना(दि.12ऑक्टोबर):- तेलंगणा यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेवरील तालुका असून येथे चार सिमेंट कंपनी व गाळेगाव डब्ल्यू सी एल कोळसा खाणी सिमेंट उद्योगात अग्रसर तालुका म्हणून ओळख आहे मात्र या ठिकाणी तेलंगाना मराठवाडा या भागात परिवहन महामंडळाच्या अनेक वाहने धावतात तेलंगाना राज्यातील देखील बसफेऱ्या या भागातून जा-ये करतात मात्र आणि बस स्थानक व्हावे.

म्हणून लोकप्रतिनिधीचे प्रयत्न झाले जागेची देखील पाहणी करण्यात आली होती तसा प्रस्तावही मला सादर करण्यात आला मूल्यनिर्धारण रेडी रेकनर यावर आधारित असल्याने जागा उपलब्ध होणे अडचणीचे झाले पण हे तालुक्याचे ठिकाण असून परिसरात कुठेही बसस्थानकाच्या सोयीची जागा उपलब्ध नाही.

शेतकऱ्यांनी तयारी दर्शवूनप्रस्ताव दिला मात्र चामुर्शी पोंभुर्णा पेक्षाही कमी दर काढल्यामुळे मूल्यनिर्धारण दरात जागा उपलब्ध होणे अडचणीचे असून बस स्थानका करिता शेतकऱ्यांची वाटाघाटी करून दर निश्चित करून जमीन उपलब्ध होऊ शकते मात्र ज्या क्षेत्रात सर्वाधिक महामंडळाला उत्पादन मिळतो या भागातच प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.

कोरपना गडचांदूर येथे बसस्थानक नसल्यामुळे ऊन पावसात दुकानाच्या आडोशाने उभे राहून वेळ काढतात दोन्ही ठिकाणी मुत्रीघरस्वच्छालय देखील सुविधादेखील उपलब्ध नसल्याने महिला प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत असल्याने अनेक वेळा एसटी महामंडळाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे प्रवासी गैरसोयीचा सामना करीत आहे कोरपना येथील पाहणी केली.

जागा शहराच्या मध्यभागी असल्यामुळे अत्यंत प्रवाशांचे सोयी युक्त असल्यामुळे अकृषक मूल्यनिर्धारण करून बसस्थानकाची जागा निश्चित करावी मागणी नागरिकांची आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सय्यद आबीद अली यानी पालक मत्रीं व जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनातुन कोरपना व गडचांदुर बस स्थानक प्रश्नसोडविण्याची मागनी केली आहे.