परतीच्या पावसामुळे सोंगलेली सोयाबीन पाण्यात!

36

✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-8308862587

रिसोड(दि.12ऑक्टोबर):-दापुरी खु. येथे व परिसरातील काही भागात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी विजासह जोरदार अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी सोंगलेल्या सोयाबीन पिकांची पसर व काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगुन ठेवलेल्या सुड्यात पाणी शिरल्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.

पहिलेच शेतातील साचलेले पाणी कमी होते की नाही तोच रविवारी जोरदार पाऊस पडल्याने शेतात साचलेल्या पाण्यात भर पडली आहे. शेतात साचलेल्या पाण्यामुळे सोयाबीन पिक करपुन गेले तसेच शेंगांना कोंब फुटले आहे. ऐवढे संकट येवूनही शेतकरी नशिबी आहे. त्या मध्ये समाधान मानून शिल्लक राहिलेले सोयाबीन पिकांची सोंगणी करून टाकली आहे.

काही शेतकऱ्यांनी सोयाबीन सोंगुन टाकली असुन सोयाबीनची पसर व काही शेतकऱ्यांच्या जमा केलेल्या सुडयांमध्ये रविवारच्या जोरदार पावसामुळे पाणी शिरून पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. या पीक नुकसानीची तात्काळ पाहाणी करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.